शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सुपेच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST

बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांच्यासमोर दहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्याने येत्या २ फेब्रुवारीला आहे त्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीमध्ये ...

बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांच्यासमोर दहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्याने येत्या २ फेब्रुवारीला आहे त्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

सरपंच स्वाती हिरवे असून त्यांचा सर्व कारभार त्यांचे पतिराज पाहत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. तसेच मासिक बैठकीनंतर काही विषय परस्पर प्रोसेडिंगवर घेतले जातात. ग्रामपंचायतीच्या जमाखर्चाचा विषय मागितला असता सरपंच यांचे पतीकडून धमकी दिली जाते. आम्ही सदस्यांनी घेतलेले विकासकामाचे निर्णय विचारात घेतले जात नाहीत. सरपंच यांच्याबरोबर विकासासाठी चर्चा करण्यासाठी गेलो असता, सरपंच म्हणतात की जे काही चर्चा असेल ती माझ्या पतीसोबत करावी. तेच सर्वस्वी निर्णय घेतील, असे सरपंच सांगत असल्याने सदस्यांची कुचंबणा होत होती. तसेच येथील कोणत्याच सदस्याला विश्वासात न घेता कामकाज सुरु असल्याने सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला असल्याचे तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या पत्रावर मीनाक्षी बारवकर, भाग्यश्री बसाळे, रेखा चांदगुडे, राजेश्री धुमाळ, ज्योती जाधव, सुधीर बारवकर, अशोक सकट, मुनीर डफेदार, शौकत कोतकाल, गणेश जाधव आदी दहा सदस्यांच्या सह्या आहेत.

---