शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र जनतेला उकसवणाऱ्या राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करा; पुण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 15:46 IST

रवि राणा व नवनीत राणा यांनी अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. व महाराष्ट्राच्या जनतेला उकसावण्याचा प्रयत्न केला

पुणे : मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवासस्थानी मातोश्री बंगल्यासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहोत. असे आव्हान नवनीत आणि रवी राणा यांनी दिले होते. काल सकाळी ते मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार होते. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या घरासमोर ठिय्या मांडून बसले होते. हिम्मत असेल तर मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा म्हणून दाखवा. असे आव्हानही शिवसैनिकानी दिले होते. राणा दाम्पत्य माघार घेण्यास तयार नव्हते. शिवसैनिकांची गर्दी पाहून ते घराबाहेरही आले नाहीत. अखेर पोलिसांनी घरात घुसून त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक केली. 

अटक करतेवेळी रवि राणा व नवनीत राणा यांनी अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. व महाराष्ट्राच्या जनतेला उकसावण्याचा प्रयत्न केला, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज्यशासना विरुद्ध कट करणे, शिवीगाळ करणे ह्यासाठी नवनीत राणा व रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी स्वारगेटपोलिस स्टेशन मध्ये अर्ज करण्यात आला आहे. नवनीत राणा व रवी राणा हे जाणून बुजून दंगली घडवण्याची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नवनीत राणा व रवि राणा ह्याच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे असा अर्ज चित्रपट निर्मात्ते निलेश नवलाखा व सामाजिक कार्यकर्ते संग्राम होनराव यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक श्री सोमनाथ जाधव यांच्या कडे अर्ज केला आहे

टॅग्स :PuneपुणेMLAआमदारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSocialसामाजिकswargateस्वारगेटPoliceपोलिस