शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

सणसवाडीत फटाके वाजवण्यावरून मारामारी

By admin | Updated: August 8, 2015 00:47 IST

सणसवाडी (ता. शिरूर) येथे निवडणुकीत विजयी झाल्यानंतर फटाके वाजवल्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथे निवडणुकीत विजयी झाल्यानंतर फटाके वाजवल्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांच्या ४५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ १२ जणांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून सणसवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भैरवनाथ पॅनल व जय मल्हार पॅनल यांचे एकमेकांविरोधात उमेदवार निवडणुकीस उभे होते. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास भैरवनाथ पॅनलचे विजयी उमेदवार बाबाजी दरेकर यांच्या समर्थकांनी निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार सागर दरेकर यांच्या घरासमोर फटाके वाजविल्याच्या कारणावरून विजयी व पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. यानंतर जमावामधील समर्थकांच्या हातातील काठ्या, लोखंडी गज, लोखंडी दांडक्यांच्या साह्याने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात इनोव्हासह अनेक चारचाकी वाहनांच्या काचाही जमावाने फोडल्या होत्या. या जोरदार भांडणाची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांना समजताच व वादातील दोन्ही बाजूंचा जमाव लक्षात घेऊन शेजारील रांजणगाव पोलिसांनाही मदतीला बोलावून घेतले. दीड-दोन तास चाललेली मारामारी बाराच्या सुमारास नियंत्रणात आल्यानंतर दोन्ही बाजूंच्या ४५ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले असून त्यातील सूरज रमेश दरेकर, मिलिंद रघुनाथ दरेकर, भानुदास विनायक दरेकर, गणेश बबन दरेकर, बबन पन्नालाल दरेकर, विजय बबन दरेकर, शिवाजी पन्नालाल दरेकर, देवराम पठाणराव दरेकर, प्रल्हाद बबन दरेकर, अक्षय शिवाजी दरेकर, मंगेश पन्नालाल दरेकर, गणेश कैलास दरेकर आदी १२ जणांना अटक केली. शिरूर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. (वार्ताहर)