शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

युवतीची मृत्यूशी झुंज

By admin | Updated: January 17, 2015 00:16 IST

छेडछाडीने त्रस्त आणि पोलिसांकडे जाऊनही योग्य दखल न घेतल्याने युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पिंपरी : छेडछाडीने त्रस्त आणि पोलिसांकडे जाऊनही योग्य दखल न घेतल्याने युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. भोसरीत घडलेल्या या घटनेतील युवती मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेची गांभीर्यता लक्षात घेत पुण्याचे सह पोलीस आयुक्त संजीवकुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे. भोसरी परिसरात राहणारी ही युवती रोडरोमिओंच्या छेडछाडीमुळे त्रस्त होती. ३१ डिसेंबरला रात्री त्यांनी युवतीच्या घरी घुसून तिच्या आईला धक्काबुक्की करून युवतीशी गैरवर्तन केले. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी पोलीस चौकी व ठाण्यात गेलेल्या तिच्या कुटुंबीयांकडे पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. नंतर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या अंतर्गतदेखील त्रास देणाऱ्यांवर कसलीही कारवाई करण्यात आली नाही. पीडित युवतीच्या तक्रारीची पोलीस योग्य दखल घेत नसल्याने निराश झालेल्या युवतीने ३ जानेवारीला घरात गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तिला भोसरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री तिला पिंपरी संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, प्रकरण अंगलट येऊ लागल्याने अखेर ३ जानेवारीला एमआयडीसी पोलिसांनी बाबू नाईक, सचिन चव्हाण आणि अकीब शेख यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दरम्यान, रोडरोमिओंचा छेडछाडीचा त्रास आणि पोलिसांकडून जाऊनही त्यांनी योग्य दखल न घेतल्याने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)