सासवड येथे दोन गटांत मारामारी, दोन्ही गटांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:10 IST2021-01-22T04:10:21+5:302021-01-22T04:10:21+5:30

आरोपी यांनी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून हातात लोखंडी कोयते घेऊन संगनमताने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. ...

Fighting between two groups at Saswad, charges filed against both groups | सासवड येथे दोन गटांत मारामारी, दोन्ही गटांवर गुन्हे दाखल

सासवड येथे दोन गटांत मारामारी, दोन्ही गटांवर गुन्हे दाखल

आरोपी यांनी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून हातात लोखंडी कोयते घेऊन संगनमताने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. याप्रकरणी स्वप्नील दीपक टकले (वय २३ रा नेताजी चौक सासवड) यांनी फिर्याद दिली आहे. विनय सुधीर जमदाडे ,गौरव पांडुरंग धोत्रे, धनंजय मुन्ना भोंगळे, मल्हार राजेंद्र साळुंखे, परेश सलील बागवान, अक्षय भोलेनाथ निघूल, अभिषेक प्रमोद गोंधळे, कुणाल तळेकर, स्वप्नील दत्तात्रय ढगारे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी आधी झालेल्या भांडणावरून, बेकायदेशीर जमाव जमवून जीवे मारण्याच्या दृष्टीने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत केल्या व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून मनोज पांडुरंग म्हेत्रे यांनी सोन्या जाधव, योगेश दादा टकले, शुभम बाळासाहेब टकले, स्वप्नील दीपक टकले, प्रवीण मधुकर भोसले, किरण राजेंद्र दीक्षित, संकेत दीपक टकले यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: Fighting between two groups at Saswad, charges filed against both groups