भारती विद्यापीठ परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 22:04 IST2025-10-10T22:04:06+5:302025-10-10T22:04:52+5:30
Pune Crime News: भारती विद्यापीठ परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये गुरुवार (दि. १०) सायंकाळी हिंसक हाणामारी झाली असून हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांतून जोरदार व्हायरल झाला आहे.

भारती विद्यापीठ परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
धनकवडी - भारती विद्यापीठ परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये गुरुवार (दि. १०) सायंकाळी हिंसक हाणामारी झाली असून हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांतून जोरदार व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थी एकमेकांना हाणामारी करताना दिसत आहेत, मात्र अद्याप ही, हाणामारीला कारणीभूत असलेला नेमका वाद किंवा कारण स्पष्ट झालेले नाही.
भारती विद्यापीठ पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरु केला असून, व्हिडिओतील घटनेचा आधार घेऊन दोन्ही गटातील विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि उपस्थितांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
या संदर्भात बोलताना पोलिसांनी माहिती दिली की, जे कोणी या प्रकारातील घटनांशी संबंधित असेल तर त्यांनी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, जेणेकरून वेगवान कारवाई करता येईल.