शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे उत्पन्न घटल्याने अंशत: वेतन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 11:51 IST

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी पावसामुळे प्रवासीसंख्येत मोठी घट

ठळक मुद्देएसटी महामंडळाचे स्पष्टीकरण : चर्चांना पूर्णविरामठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन

पुणे : मागील दोन महिन्यांत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन दिले. तसेच इतर काही विभागांतील एक-दोन आगारांमध्येही अंशत: वेतन दिले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना उर्वरित वेतन तातडीने देण्यात आल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनकपातीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला दिले जाते. मात्र, नोव्हेंबर महिन्यातील वेतन अनेक कर्मचाऱ्यां ना कमी मिळाले. एसटीची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. कर्मचारी संघटनांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र, महामंडळाने ‘ही कपात नसून वेतनासाठी पुरेसे पैसे नसल्याने अंशत: वेतन दिल्याचे’ स्पष्ट केले आहे. एसटीचे ३१ विभागांतर्गत एकूण २५० आगार आहेत. या आगारांतील कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला वेतन देण्यासाठी प्रत्येक आगारामध्ये महिन्याच्या १ तारखेपासून प्रवासी उत्पन्न स्थानिक पातळीवर संकलित करण्यात येते.  वेतनासाठी मध्यवर्ती कार्यालयातूनही दरमहा ५० टक्के निधी विभागाला वितरित केला जातो. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाते. ......प्रवासी संख्येत मोठी घटऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी पावसामुळे प्रवासीसंख्येत मोठी घट झाली आहे. त्याचा एसटीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचबरोबर १ डिसेंबरपासून काही विभागांत प्रवासी उत्पन्नामध्ये घट झाली. त्यामुळे या विभागांना वेतनासाठी आवश्यक रक्कम उपलब्ध होऊ श्कली नाही. त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या विभागांतील सर्व कर्मचाºयांना अंशत: वेतन देण्यात आले. तर नांदेड, परभणी, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, औरंगाबाद, अकोला या विभागांतील एक-दोन आगारांध्येही अंशत: वेतन द्यावे लागले. या विभागांना महामंडळाच्या मुख्यालयातून तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्यात आली असून संबंधित कर्मचाºयांचे उर्वरित वेतन देण्यात आल्याची माहिती एसटीच्या जनसंपर्क विभागाने दिली. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारpassengerप्रवासी