मातीपरीक्षण करून खते द्यावीत

By Admin | Updated: July 3, 2014 05:59 IST2014-07-03T05:59:01+5:302014-07-03T05:59:01+5:30

जमिनीतील अन्न घटकद्रव्य टिकवून ठेवण्यासाठी बेसुमार रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा़ मातीपरीक्षण करूनच खते द्यावीत़

Feeding the soil and giving fertilizers | मातीपरीक्षण करून खते द्यावीत

मातीपरीक्षण करून खते द्यावीत

निरगुडसर : जमिनीतील अन्न घटकद्रव्य टिकवून ठेवण्यासाठी बेसुमार रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा़ मातीपरीक्षण करूनच खते द्यावीत़ आधुनिक शेतीबरोबर सेंद्रिय शेतीची शेतकऱ्यांनी कास धरावी, असे मत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले़ वसंतराव नाईक कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात ते बोलत होते़
यावेळी डॉ डी़ वाय़ पाटील अ‍ॅकडमी संचलित वसंतदादा पाटिल कृषि महाविदयालयाच्या कृषिकन्यांनी कृषि दिंडी काढली़व वृक्षारोपणही केले़ विद्यार्थी देखील यात सहभागी झाले होते़ यावेळी
कृषिकन्या प्रियांका गटे, माधुरी गायकवाड, भारती गोडे, रेश्मा वाळुंजकर, मयुरी झेंडे यांनी शेती विषयक माहिती दिली़रामदास थोरात़ एम बी गव्हाळे कृषीपर्यवेक्षक डिक़े भोर, शेटे उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Feeding the soil and giving fertilizers