शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

भाजपाकडून दहशत व अमिषाचे राजकारण: पृथ्वीराज चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 8:15 PM

भाजपचा एकाही कार्यकर्ता किंवा संघाची विचार धारा असणा-या व्यक्ती भाजपने निवडणूकीसाठी उमेदवारी म्हणून दिला नाही.

ठळक मुद्देभाजपकडून व्यक्ती केंद्रीत राजकारण

पुणे: भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत दहशतीचे आणि अमिषाचे राजकारण केले जात आहे. साम, दाम, दंड,भेद यावर भाजपचे सुरू असलेले राजकारण दुदैवी आहे,असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच ज्यांनी प्रसंगी तुरूंगवास सोसून भाजप पक्षाला सत्ता मिळवून दिली. त्यापैकी भाजपचा एकाही कार्यकर्ता किंवा संघाची विचार धारा असणा-या व्यक्ती भाजपने निवडणूकीसाठी उमेदवारी म्हणून दिला नाही.अनेक उमेदवार काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातून आयात केले आहेत.भाजपला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे.मात्र, महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहत आहेत,असेही चव्हाण यांनी नमूद केले.कॉँग्रेस पक्षाचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण,आमदार विश्वजीत कदम,शहराध्यक्ष रमेश बागवे,प्रवीण गायकवाड,संगीता तिवारी आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, भाजपकडून व्यक्ती केंद्रीत राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत मिळालेला प्रतिसाद पाहता मोदी लाट पूर्णपणे ओसरली आहे. मागील निवडणूकीत मोदींनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली त्याचे आकलन लोकांनी केलेले आहे. त्यामुळे मागील निवडणूकीत दिलेल्या अश्वासनांचे काय झाले, असे लोक भाजपला विचारत आहेत. काँग्रेसने प्रकाशित केलेला जाहीरनामा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे.या जाहिरनाम्यातील मुद्यांसह शेतक-यांचे प्रश्न, बेरोजगारी, नोटबंदी आणि जीएसटीमूळे सर्व सामान्य नागरिक आणि व्यापा-यांचे नुकसान झाले आहे. तसेच राफेलमधील घोटाळा या मुद्द्यांवर काँग्रेसतर्फे प्रचार केला जाणार आहे.मावळ येथील शेतकरी गोळीबारावर ते म्हणाले, या प्रकारच्या घटनांबाबतचे आदेश कधीही राजकीय स्तरावर दिले जात नाहीत. स्थानिक परिस्थीती पाहून तेथील प्रमुख पोलीस अधिकारी यावर निर्णय घेत असतात. परतु, या घटनेची सर्व चौकशी व इतर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.त्यामुळे हा मुद्दा केवळ राजकीय आरोप करण्यापुरता उरला आहे.

टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक