बाॅम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे धायरी परिसरात घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 17:07 IST2019-01-10T17:05:42+5:302019-01-10T17:07:22+5:30

धायरीत डीएसके रस्त्यावर दळवीवाडी येथे बॉम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे परिसरात जिवंत बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती.

fear in dhyari due to bomb type thing found | बाॅम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे धायरी परिसरात घबराट

बाॅम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे धायरी परिसरात घबराट

खडकवासला: धायरीत डीएसके रस्त्यावर दळवीवाडी येथे  बॉम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे परिसरात जिवंत बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीकाळ भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 
धायरी परिसरातील डीएकसे  रस्त्यावर गुरुवारी दुपारी  दोन वाजता कचराकुंडीजवळ बॉम्बसदृश्य वस्तू कचरावेचकांना  आढळली. त्यांनी तत्काळ पोलिसांना खबर दिली. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासनी केली असता युद्धप्रसंगी वापरले जाणारे  रणगाडाविरोधी बुलेट सापडले आहे. 

सदर वस्तू परिसरात कोठून आली याबाबत पोलिस तपास करत आहे. या वस्तूचा ताबा  पुणे लष्कराकडे सोपविण्यात आला असल्याचे सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.

Web Title: fear in dhyari due to bomb type thing found