Pune | अनैतिक संबंधांच्या संशयावरून पिता-पुत्रावर कोयत्याने वार; वाघोलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 10:08 IST2023-02-27T10:06:21+5:302023-02-27T10:08:05+5:30

लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल...

Father-son stabbing on suspicion of immoral relationship; Events in Wagholi | Pune | अनैतिक संबंधांच्या संशयावरून पिता-पुत्रावर कोयत्याने वार; वाघोलीतील घटना

Pune | अनैतिक संबंधांच्या संशयावरून पिता-पुत्रावर कोयत्याने वार; वाघोलीतील घटना

वाघोली (पुणे) : अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका चहा विक्रेत्यावर आणि त्याच्या मुलावर काेयत्याने वार केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी वाघाेलीतील बाईफ राेड येथे घडला. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव तुकाराम राऊत (वय ४२), तन्मय महादेव राऊत (वय १२ दोघेही रा. वाघोली) असे गंभीर जखमी झालेल्या पिता-पुत्राचे नाव आहे तर रवींद्र श्रीराम कदम (रा. वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संदीप हजारे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस करीत आहेत.

Web Title: Father-son stabbing on suspicion of immoral relationship; Events in Wagholi