शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात पावसाची दडी; बळीराजा चिंतातुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 12:39 IST

यंदा मॉन्सून वेळेआधी येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र, तो फसला त्यानंतर मॉन्सून आठ दिवसांनी उशिरा केरळमध्ये दाखल झाला..

ठळक मुद्देआकाशात काळे काळे ढग; पण बरसेनात : शेतकऱ्यांची मशागतीची तयारी पूर्णजिल्ह्यातील सर्व धरणे रिकामी झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई शेतकरी अद्यापहीhttp://cms.lokmat.com/node/add/status मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेतढग दाटून आले; पण पाऊस पडेना

वायू चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वाटचाल थंडावली. त्यामुळे अजूनही कोकणात मॉन्सून दाखल झालेला नाही. थोड्याफार प्रमाणात जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली. परंतु, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे रिकामी झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागल्याचे दिसून येत आहे........बेल्हा : बेल्हा (ता. जुन्नर) व परिसरातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येथे काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. तो पाऊस कमी प्रमाणात झाला. पाऊस उशिरा होत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नैराश्य पसरले आहे. परिसरातील कूपनलिका, विहिरी यांचे पाणी खोल गेल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. ठिकाणी कूपनलिका व विहिरी आटल्या आहेत. शेतातील ढेकळेही अद्याप फुटलेली नाहीत. खरीप हंगामातील पिकांची पेरणी उशिरा करावी लागत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. तसेच काही ठिकाणी तर अद्याप पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शेतकरी वर्गाने शेतात शेणखत टाकले आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणीचे बी-बियाणे खरेदी करुन ठेवले आहेत. पाऊस जर लवकर झाला नाही तर ते वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागून राहिले आहेत.......ढग दाटून आले; पण पाऊस पडेनानेरे : भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील नेरे, आंबवडे (ता. भोर) परिसरात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ हवामान होऊन पावसाचे वातावरण तयार होत आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने तसेच पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी सर्वत्र चिंतातूर झाले असल्याचे चित्र दिसत आहे.परिसरात एकीकडे शेतीची मॉन्सूनपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असली तरी पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी अद्यापही वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत. रोहिणी नक्षत्रामध्ये वळवाचा पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती; मात्र रोहिणी नक्षत्र कोरडेठाक गेल्याने बळीराजाची आशेची निराशा होऊन बसली आहे. पावसाचे वातावरण चांगले तयार झाल्याने यावर्षी मृग नक्षत्रालाच पेरण्या होण्याची दाट शक्यता होती. शेतकऱ्यांनीही मॉन्सूनपूर्व शेतीची मशागत करून ठेवली होती. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.नेरे, आंबवडे (ता. भोर) परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने पाऊस वेळेत पडणे आवश्यक आहे. प्रामुख्याने या परिसरात भातपिक मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाते. भातपिकाला पावसाची मोठी गरज आहे. परंतु पाऊस वेळेत झालाच नाही तर येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.............मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच म्हणजे ७ जूनला वरुणराजाचे हलके आगमन झाल्याने सर्वांनाच सु:खद धक्का बसला होता. परंतु त्यानंतर त्याने दांडी मारली. त्यामुळे या वर्षी वर्तविण्यात आलेल्या सर्व अंदाजांना खोटे ठरवत पाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातुर झाला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पहाटेपासूनच पावसाचे ढग आकाशात दिसतात; परंतु त्याचे रूपांतर पाण्यात होत नसल्याने तो कधी बरसणार यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

एकीकडे मशीगतीची सर्व कामे पूर्ण झाली असली, तरी पेरणीयोग्य पावसाची अद्याप प्रतीक्षा कायमच आहे. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर वळवाचा पाऊस पडेल ही अपेक्षा शेतकºयांसह सर्वांनाच होती. परंतु रोहिणी नक्षत्र सालाबादप्रमाणे कोरडे ठणठणीत गेले. गेले काही वर्षे पुणे जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडलेला नाही. या वर्षीही तो पडला नाही. समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला असल्याने व मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

अनेक वर्षानंतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारी किंवा जसे जमेल तसे खते, बियाण्यांचे नियोजनही केले. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दडी मारली. यानंतर आज येईल, उद्या येईल असे करता-करता बरेच दिवस उलटले. तूर्तास आभाळाकडे नजरा लावून बसण्यापलीकडे शेतकऱ्यांच्या हाती सध्यातरी काही उरले नाही.बळीराजा आपली सर्व दु:खे विसरून यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल म्हणून रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीचे कार्य जोमाने करू ..............मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. यावर्षी लवकर पेरणी करायची या आशेने अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खताची खरेदी केली. पावसाचे वातावरण असल्याने बियाणे विक्रीच्या दुकानांवर गर्दी केली. खरेदीत आलेली तेजी पाहता विक्रेत्यांनीही थोड्याफार फरकाने जादा दर आकारत पैसा वसूल करण्याचा प्रयत्न केला. पावसाचे वातावरण पाहून शेतकºयांनाही घासाघीस न करता, बियाणे व खत खरेदी केली. यातून कमी-अधिक प्रमाणात अनेक शेतकऱ्यांना जादा पैसेही मोजावे लागले. हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये पावसाळ्यात प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर बाजरीची पेरणी करतात. यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने बाजरीची अजिबात पेरणी झालेली नाही. बाजरीचे पीक काढल्यानंतर त्याच शेतात कांद्याचे पीक केले जाते. दीड महिन्यापूर्वी नवा मुठा उजव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्यामुळे हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीला व पिण्याच्या पाण्याची प्रथमच अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे.  

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसdroughtदुष्काळagricultureशेती