शेतकऱ्यांचे वीज ताेडल्याप्रकरणी इंदापूरला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:25+5:302021-02-05T05:05:25+5:30

इंदापूर : शेतकऱ्यांचे वीजजोड तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ भाजप आणि मित्रपक्षातर्फे महावितरण कार्यालयासमोर सोमवारी (दि. १) आक्रमक ...

Farmers protest in Indapur over power outage | शेतकऱ्यांचे वीज ताेडल्याप्रकरणी इंदापूरला आंदोलन

शेतकऱ्यांचे वीज ताेडल्याप्रकरणी इंदापूरला आंदोलन

इंदापूर : शेतकऱ्यांचे वीजजोड तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ भाजप आणि मित्रपक्षातर्फे महावितरण कार्यालयासमोर सोमवारी (दि. १) आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी दिला.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कार्यालयासमोर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज तोडणी मोहीम थांबवावी, या मागणीसाठी राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. जर वीज कनेक्शन तोडण्यासाठी महावितरणचा कर्मचारी आला, तर त्यांना गुलाबाचे फुल देऊन माघारी पाठवा, असे आवाहन मयूरसिंह पाटील यांनी केले.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार म्हणाले, शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या विरोधात हे आंदोलन असून जर महावितरणने वीज तोडणी मोहीम थांबली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल. तसेच तालुक्यातील वीज कनेक्शनची तोडणी व सक्तीची वसुली बंद करावी,असे आवाहन यावेळी जामदार यांनी केले.

यावेळी रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख शिवाजीराव मखरे, दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, हर्षवर्धन पाटील मोटार वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, गटनेते कैलास कदम, इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक मेघ:शाम पाटील, क्रांतीज्योती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे, सामजिक कार्यकर्ते संदिपान कडवळे, नगरसेवक जगदीश मोहिते, अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे, हर्षवर्धन कांबळे यांनी बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे सहाय्यक अभियंता रघुनाथ गोफणे यांना निवेदन दिले. फोटो ओळ : इंदापूर येथे शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या विरोधात मयूरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देताना कार्यकर्ते

Web Title: Farmers protest in Indapur over power outage