शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

उत्तरप्रदेशातील शेतकरी अत्याचार विरोधात पुण्यात निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 17:21 IST

विरोधी पक्षांकडून भाजप विरोधात आंदोलन

ठळक मुद्देशेतकऱ्यांना धडा शिकवा अशी जाहीर भाषा करण्याएवढा सत्तेचा भाजपला माज

पुणे : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.  उपमुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. त्यांच्यावर गाडी आदळण्यात आली आहे. मोर्य हे टेनी यांच्या मुळ गावी योजनांच्या उद्घाटनासाठी जात होते.

यावेळी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. संतप्त शेतकऱ्यांनी टेनी यांच्या मुलाच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या तीन गाड्या पेटवून दिल्या होत्या. त्याचे पडसाद सर्व देशात उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांकडून भाजप विरोधात आंदोलन छेडली जात आहेत.  

पुण्यातही वसंतराव नाईक पुतळा शिवाजीनगर येथे उत्तरप्रदेशातील शेतकरी अत्याचार विरोधात संयुक्त शेतकरी बचाव आंदोलनातर्फे निदर्शने करण्यात आली.  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, जनता दल (से), शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अंगमेहनती  कष्टकरी संघर्ष समिती, लोकायत, मराठा सेवा संघ आदी सहभागी झाले होते. 

'तानाशाही नही चलेगी, योगी सरकार अन्यायाचे सरकार, शेतकऱ्यांना चिरडणारे सरकार अशा घोषणा देत संघटनाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला. तर शेतकऱ्यांना धडा शिकवा अशी जाहीर भाषा करण्याएवढा सत्तेचा माज भाजपला चढला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.'  

यावेळी मोहन जोशी, अभय छाजेड, बी जी कोळसे पाटील, प्रशांत जगताप, नितीन पवार रमेश बागवे, कमल व्यवहारे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेUttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस