भीमाशंकर येथे दरीत पडून तरुण-तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 18:42 IST2019-03-04T18:40:10+5:302019-03-04T18:42:15+5:30
दावडी भीमाशंकर येथे एका अज्ञात तरुण - तरुणीचा नागफडी पॉईटवरुन पाचशे फुट दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि. ४ )दुपारी चार वाजता घडली आहे.

भीमाशंकर येथे दरीत पडून तरुण-तरुणीचा मृत्यू
भीमाशंकर : दावडी भीमाशंकर येथे एका अज्ञात तरुण - तरुणीचा नागफडी पॉईटवरुन पाचशे फुट दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि. ४ )दुपारी चार वाजता घडली आहे. मात्र ही हत्या की आत्महत्या याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.
आज महाशिवरात्र असल्यामुळे भीमाशंकर थेथे भाविकांची गर्दी दर्शनासाठी होत असते. आज दुपारी चार वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला तरुण- तरुणी ५०० फूट दरीत काेसळल्याचा फाेन आला. त्यानंतर खेड पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक अरविंद चाैधरी यांनी तातडीने कर्मचाऱ्यांसह नागफणी पाॅईंट येथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी तरुणीचा मृतदेह दुर्बिनीद्वारे दिसून आला परंतु दरी पाचशे फूट खाेल असल्याने तरुणाचा मृतदेह दिसून आला नाही. मृतदेह काढण्यासाठी पाेलीस कर्मचाऱ्यांनी दरीत उतरण्याचा प्रयत्न केला. याबाबत पाेलीस निरीक्षक अरविंद चाैधरी यांनी एनडीआरएफ च्या जवानांना याबाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.