विवाहितेला ब्लॅकमेल करत फेसबुक फ्रेंडची १ कोटीची मागणी; न्यूड फोटो व व्हिडिओ ठेवला स्टेटसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:32 IST2021-07-15T21:30:11+5:302021-07-15T21:32:57+5:30

आरोपीने फिर्यादीसोबत फेसबुक मेसेंजरव्दारे संपर्क साधला होता.

Facebook friend demands Rs 1 crore by blackmailing to married woman | विवाहितेला ब्लॅकमेल करत फेसबुक फ्रेंडची १ कोटीची मागणी; न्यूड फोटो व व्हिडिओ ठेवला स्टेटसला

विवाहितेला ब्लॅकमेल करत फेसबुक फ्रेंडची १ कोटीची मागणी; न्यूड फोटो व व्हिडिओ ठेवला स्टेटसला

पुणे : एका विवाहितेला फेसबुक फ्रेंडने ब्लॅकमेल करत तब्बल १ कोटी रुपयांची मागणी केली. संबंधित तरुणाने विवाहितेवर बलात्कार करत त्याचे चित्रीकरण केले होते. हे फोटो व व्हिडिओ त्याच्याकडे होते. ते देण्याच्या बदल्यात तो पैशाची मागणी करत होता. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ सुभाषचंद्र सुखिजा (वय ३४, रा. पटियाला, पंजाब) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार , आरोपीने फिर्यादीसोबत फेसबुक मेसेंजरव्दारे संपर्क साधला होता. त्यांची ओळख वाढल्यानंतर तो पटीयालावरुन पुण्यात तिला भेटायला आला होता. तेथे त्याने तिच्याच फ्लॅटमध्ये तिला सरबतातून गुंगीचे औषध दिले. ती गुंगीत असताना तिच्यावर बलात्कार केला. याचे फोटो आणि व्हिडिओ शुटींग त्याने करुन ठेवले होते. तसेच तिचे मंगळसूत्रही त्याने काढून घेतले होते. हे फोटो व शुटींग त्याने स्वत:च्या स्टेटसला ठेवले होते. मंगळसूत्र,फाेटो व व्हिडिओ शुटींग परत देण्याच्या बदल्यात त्याने तिला १ कोटी रुपयांची मागणी केली होती. यासाठी तो वारंवार फोन, मेसेज व व्हिडिओ कॉल करुन तिला धमकी देत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड अधिक तपास करीत आहेत

Web Title: Facebook friend demands Rs 1 crore by blackmailing to married woman