शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 9:39 PM

येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 

ठळक मुद्देराज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज

पुणे : कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़. येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील जव्हार १५०, मोखेडा ११०, माथेरान, विक्रमगड ९०, कर्जत ८०, खालापूर ७०, कणकवली, तलासरी, वाल्पोई, वाडा ६०, दापोली, पेण, फोंडा, राजापूर ५०, भिवंडी, चिपळूण, दाभोलिम, खेड, म्हसळा, पोलादपूर, रोहा, वैभववाडी ४० मिमी पावसाची नोंद झाली होती़ .मध्य महाराष्ट्रात अक्कलकुवा १००, महाबळेश्वर ८०, इगतपुरी, पेठ ७०, ओझरखेडा ६०, हरसूल, नवापूर, राधानगरी, सुरगाणा, तळोदा ५० मिमी पाऊस पडला़ याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़. मराठवाड्यातील धनसावंगी, मुखेड ३०, अर्धापूर, विल्लोली, पूर्णा, सेलू, वासमत २०, औंढा नागनाथ, भोकरदन, दिगलूर, जाफ्राबाद, जालना, कन्नड, नांदेड, निलंगा, परभणी परतूर, पाथरी १० मिमी पाऊस पडला़. विदर्भात भामरागड ४०, अहिरी सिरोंचा ३०, मौदा २० मिमी पाऊस पडला होता़. घाटमाथ्यावरील अम्बोणे १५०, शिरगाव, कोयना, लोणावळा, दावडी, ताम्हिणी १३०, वळवण १००, डुंगरवाडी ९०, खोपोली ८०, भिरा ७०, शिरोटा, भिवपूरी ५० मिमी पावसाची नोंद झाली होती़ .शनिवारी दिवसभरात नागपूर येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली असून राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी आल्या होत्या़. येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. कोकण, गोव्यात जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २३ जुलैला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २४ जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ .

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भgoaगोवा