Pune Police: खंडणी उकळणे, ब्लॅकमेल करणे; पुण्यातील ६ पोलिसांवर बडतर्फीची टांगती तलवार, सोनाली हिंगेसहीत दोघे फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:00 IST2026-04-11T09:59:24+5:302026-04-11T10:00:41+5:30

खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, रिलस्टार सोनाली हिंगे आणि पोलिस कर्मचारी सुदाम तायडे हे तिघे फरार झाले आहेत

Extortion, blackmail; 6 Pune policemen face dismissal, two including Sonali Hinge absconding | Pune Police: खंडणी उकळणे, ब्लॅकमेल करणे; पुण्यातील ६ पोलिसांवर बडतर्फीची टांगती तलवार, सोनाली हिंगेसहीत दोघे फरार

Pune Police: खंडणी उकळणे, ब्लॅकमेल करणे; पुण्यातील ६ पोलिसांवर बडतर्फीची टांगती तलवार, सोनाली हिंगेसहीत दोघे फरार

पुणे : शहर पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. खंडणी उकळणे, ब्लॅकमेल करणे आणि अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

मंगळवार पेठेतील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पोक्सोअंतर्गत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, रिलस्टार सोनाली हिंगे आणि पोलिस कर्मचारी सुदाम तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा धुळीस मिळाल्याचा ठपका ठेवत आता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वाघोली पोलिस ठाण्यातील आणखी एका प्रकरणात पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे यांनी आयटी अभियंता तरुण-तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत दहा हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत तरुणाला मारहाणही करण्यात आल्याचे समोर आले आहे. या तिघांवर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची तक्रार संबंधित तरुण-तरुणीने थेट पोलिस आयुक्तांकडे केल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीत संबंधित पोलिसांनी कर्तव्यावर असताना अधिकाराचा गैरवापर करून धमकावून पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांनी धमकीचा मार्ग अवलंबल्याचे समोर आले आहे.

तीन जण फरार

खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, रिलस्टार सोनाली हिंगे आणि पोलिस कर्मचारी सुदाम तायडे हे तिघे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या तिघांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Web Title : पुणे पुलिस: उगाही और ब्लैकमेल के आरोप में छह पुलिसकर्मी बर्खास्तगी के खतरे में

Web Summary : पुणे के छह पुलिस अधिकारियों पर उगाही और ब्लैकमेल के आरोप लगे हैं, जिसके कारण उन्हें बर्खास्त किया जा सकता है। एक अधिकारी, एक रील स्टार और एक कांस्टेबल कॉलेज के प्राचार्य से उगाही करने के बाद फरार हैं। तीन अन्य को एक युवा जोड़े को सेक्स रैकेट में फंसाने की धमकी देकर पैसे वसूलने के आरोप में निलंबित कर दिया गया है।

Web Title : Pune Police face dismissal for extortion, blackmail; two absconding

Web Summary : Six Pune police officers face dismissal for extortion and blackmail. An officer, a reel star, and a constable are absconding after extorting a college principal. Three others are suspended for extorting money from a young couple by threatening them with a sex racket case.