शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अणुचाचण्यांमुळेच असुरक्षितता

By admin | Updated: February 4, 2015 00:29 IST

जगात शांतता नांदण्याऐवजी असुरक्षितता वाढीस लागली आहे. यामागचे प्रमुख कारण हे अणुचाचण्या आहे. शत्रुराष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी अनेक देशांनी अणुचाचण्या घेतल्या.

पुणे : जगात शांतता नांदण्याऐवजी असुरक्षितता वाढीस लागली आहे. यामागचे प्रमुख कारण हे अणुचाचण्या आहे. शत्रुराष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी अनेक देशांनी अणुचाचण्या घेतल्या. यामधून अणुचाचण्या घेण्याची स्पर्धा निर्माण झाली आणि कोणताही देश कोणावरही अण्वस्त्र डागू शकतो, ही भीती निर्माण झाली असून, ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, असे मत भाभा अ‍ॅटोमिक एनर्जीतील माजी अधिकारी व अणुशास्त्रज्ञ प्रकाश बुरटे यांनी व्यक्त केले.अणुविध्वंसविरोधी समितीच्या वतीने आज ‘अण्वस्त्रमुक्त जग शक्य आहे’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी आरोग्य सेनेचे डॉ. अभिजित वैद्य, लोकायतचे नीरज जैन व्यासपीठावर उपस्थित होते. बुरटे म्हणाले, विसाव्या शतकात अण्वस्त्रे निर्माण करण्यात आली आणि पहिल्या ५० वर्षांत जगाला अस्थिरतेकडे नेण्याच्या घटना घडल्या. अमेरिका आणि रशियाने एकमेकांना शह देण्यासाठी अण्वस्त्रांची निर्मिती केली. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अण्वस्त्रे टाकली आणि यात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. यावरून याची दाहकता लक्षात आली. मात्र, त्यानंतरही शत्रुराष्ट्रांना शह देण्यासाठी अनेक राष्ट्रांनी अण्वस्त्रांची निर्मिती केली. यामुळे १९८५ मध्ये जगात तब्बल ६७ हजार अण्वस्त्रे झाली. या अण्वस्त्रांच्या तपासणीसाठी स्फोट घडवून आणल्याने जगाच्या बहुतांशी भागात त्याचे किरणोत्सार पोहोचले. या अण्वस्त्रे निर्माण करण्याच्या स्पर्धेमुळे अनेक राष्ट्रांमधील शत्रुत्व वाढत गेले आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. याचे गंभीर परिणाम समोर येऊ लागल्याने अण्वस्त्रमुक्त जग ही संकल्पना समोर आली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर युनोच्या माध्यमातून ती साकारण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. यात अनेक देशांनी भाग घेतला. मात्र भारतासह अजूनही काही देश अण्वस्त्रमुक्त होण्यास तयार नाहीत. असे असतानाही २०१३ पर्यंत जगातील अण्वस्त्रांची संख्या ६७ हजारांवरून १७ हजारांपर्यंत खाली आली. यातील ७ हजार अण्वस्त्रे काही महिन्यांमध्ये आणखी कमी होतील, असे मत बुरटे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)४जगाला खरोखरच अण्वस्त्रमुक्त करायचे असेल, तर सर्व देशांमधील नागरिकांनी सरकारवर यासाठी दबाव आणायला हवा. अमेरिके तील नागरिकांनी रस्त्यावर उतरत अण्वस्त्रे कमी करण्याची जोरदार मागणी केली. यामुळे अमेरिकेचे सरकार झुकले आणि ते कमी करण्यास सुरुवात केली. ४अशा पद्धतीने भारतासह सर्व देशांमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून अण्वस्त्रमुक्त देशाची मागणी केली तर प्रत्येक सरकार झुकेल आणि हे शक्य होईल, असे मत बुरटे यांनी व्यक्त केले.