...या भूमिकेचे स्पष्टीकरण द्या; भोंग्याच्या वादात आता असीम सरोदेंची उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 02:08 PM2022-04-19T14:08:08+5:302022-04-19T14:08:15+5:30

आवाजाच्या मर्यादेवर आतापर्यंत देशातील न्यायालयात आठ महत्त्वाचे निर्णय झाले

Explain this role Asim Sarode now jumps into the Bhonga controversy | ...या भूमिकेचे स्पष्टीकरण द्या; भोंग्याच्या वादात आता असीम सरोदेंची उडी

...या भूमिकेचे स्पष्टीकरण द्या; भोंग्याच्या वादात आता असीम सरोदेंची उडी

Next

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. गुढीपाडवा आणि ठाण्यातील सभेत त्यांनी भोंग्यावर विशेष लक्षकेंद्रित केले आहे. ठाण्यातील सभेत राज यांनी मशिदीवरचे भोंगे तीन मे पर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा देशभरात हनुमान चालीसा लावली जाईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयीन निर्णयाचा दाखला घेऊन भोंगे काढण्याबाबत भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर कायद्याचे अभ्यासक असीम सरोदे यांनी याबाबत अनेक ट्विट केले आहेत. त्यांनी कायद्याच्या मदतीने या वादामध्ये उडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने असीम सरोदे यांच्याशी  संवाद साधला. त्यावेळी त्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याचे सरोदे यांनी सांगितले आहे.        

सरोदे म्हणाले, आवाजाच्या मर्यादेवर आतापर्यंत देशातील न्यायालयात आठ महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. त्यामध्ये कार्यक्रमातील डिजे, फटाके तसेच चर्च, गुरुद्वारा, मंदिरे, मशीद, यामधील स्पीकर यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणावर प्रतिबंध लावण्यासाठी हे निर्णय दिले होते. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. एका निर्णयात न्यायालयाने शांतता क्षेत्रात ध्वनी प्रदुषण थांबवावे असं सांगितले होते. पण आतापर्यंत शांतता क्षेत्राची व्याख्याच केली नाही. न्यायालयाच्या कोणत्या निर्णयाचा दाखला देऊन मशिदीवरील भोंगे उतरावेत, अशी भूमिका घेतली याबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे.

इतर गोंगाटवेळी कोणी काही बोलत नाही 

ख्रिसमस, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आंबेडकर जयंती, विश्वकर्मा जयंती, दत्त जन्म व जयंती, दुर्गाउत्सव, महावीर जयंती, स्वामी बसवेश्वर जयंती, गणपती उत्सव, दिवाळी, लग्न, क्रिकेटची मॅच जिंकणे अश्या अनेक वेळी 'गोंगाट' व उत्सवाच्या प्रदूषित साजरीकरण बंद करण्याबाबत कुणी बोलत नाहीत याबाबतचे अनेक ट्विटही त्यांनी केले आहेत. 

Web Title: Explain this role Asim Sarode now jumps into the Bhonga controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.