वारीतील अनुभव; दरवर्षी आता ही वारी पक्की आणि हैदराबादहून अजून लोकांना जोडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:24 IST2025-06-21T19:21:39+5:302025-06-21T19:24:43+5:30

कशाचीही अपेक्षा न ठेवता भक्ती करणे काय असते, हे शिकायला मिळालं. ‘आयटी दिंडी’सारख्या उपक्रमांनी विश्वास वाटतो की, हिंदू धर्म, देश व मराठी संस्कृतीला पुढची कोट्यवधी वर्षे धक्का लागणार नाही.

Experience in Wari; Every year now this Wari is confirmed and we will connect more people from Hyderabad | वारीतील अनुभव; दरवर्षी आता ही वारी पक्की आणि हैदराबादहून अजून लोकांना जोडू

वारीतील अनुभव; दरवर्षी आता ही वारी पक्की आणि हैदराबादहून अजून लोकांना जोडू

पुणे - खास हैदराबादहून आम्ही वारीचा अनुभव घेण्यासाठी आलो! आमचा सर्वांत लहान आणि ज्येष्ठ वारकरी कसे चालतील असा प्रश्न होता; पण वारीला जायचे ठरल्यापासून एक वेगळीच ऊर्जा आली होती.

आम्ही सहा जण अगदी आनंदात बागडत पूर्ण अंतर चालून आलो. कशाचीही अपेक्षा न ठेवता भक्ती करणे काय असते, हे शिकायला मिळालं. ‘आयटी दिंडी’सारख्या उपक्रमांनी विश्वास वाटतो की, हिंदू धर्म, देश व मराठी संस्कृतीला पुढची कोट्यवधी वर्षे धक्का लागणार नाही.

नव्हे उत्तरोत्तर ती आणखीन दांडगी आणि प्रखर होत जाणार, असाही विश्वास वाटतो. दरवर्षी आता ही वारी पक्की आणि हैदराबादहून अजून लोकांना जोडू. हैदराबादहून येताना फक्त कपडे आणि रोज लागणारे सामान आणले होते; पण परत जाताना इतके अनुभव आणि भक्तिभाव घेऊन जात आहोत की, ते कुठल्या कुठल्या बॅगमध्ये बसवावे, असा प्रश्न पडला आहे. - श्रुती जोशी, हैदराबाद

Web Title: Experience in Wari; Every year now this Wari is confirmed and we will connect more people from Hyderabad