शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

अवैध धंद्यांवर कारवाईत चालढकल करणे पडले महागात ; वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ६ जणांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 6:05 PM

पोलीस अधिकाऱ्यांना कर्तव्यातला निष्काळजीपणा भोवला..

ठळक मुद्देदोन वर्षे वेतनवाढ रोखली

पुणे : वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करुन अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास कसूर केल्याबद्दल येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि ३ कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.या ६ जणांची दोन वर्षांसाठी वेतनवाढ स्थगित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, निरीक्षक अजय भीमराव वाघमारे, सहायक निरीक्षक राहुल गिरमकर, पोलीस नाईक अ.सा.गवळी, कि. ज. सांगळे, राजू बहिरट अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते़ करण घमडे (वय ३०, रा.भाटनगर, येरवडा) हा दारुची विक्री करत असताना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यात त्यांचा मृत्यु झाला.यावरुन असे निष्पन्न होते की, या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अवैध मटका व जुगार, अवैध दारु विक्री चालू होती. चौकशीत अवैध धंदेवाल्यांचे मोबाईल नंबरांची पडताळणी केली असता त्यात अवैध धंदेवाल्याशी पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्क असल्याचे आढळून आले. सहायक निरीक्षक, निरीक्षक आणि वरिष्ठ निरीक्षक यांचे कर्मचाऱ्यांवर प्रभावी पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे.जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलीन होण्यास कारणीभूत ठरल्याने त्यांची दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याचा आदेश पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम यांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्त