होऊ दे खर्च ! कोरोना संकटातही पुण्यात महागड्या कारचीच जोरदार 'चलती'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 05:33 PM2020-11-07T17:33:37+5:302020-11-07T17:44:41+5:30

चार महिन्यांत २० लाखांपुढील 'एवढ्या' कारची विक्री  

Expensive cars in Pune even in Corona crisis; Sales of over 20 lakh cars in four months | होऊ दे खर्च ! कोरोना संकटातही पुण्यात महागड्या कारचीच जोरदार 'चलती'

होऊ दे खर्च ! कोरोना संकटातही पुण्यात महागड्या कारचीच जोरदार 'चलती'

Next

पुणे : कोरोना महामारीचा फटका वाहन उद्योगालाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. पण ऑक्टोबर महिन्यात वाहन विक्रीत दिलासादायक वाढ झाल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनमध्ये राज्यात एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत वाहन विक्री बंद होती. कोरोना महामारीच्या काळातही महागड्या कारची चलती दिसुन येत आहे. 

कोरोना महामारीचा फटका वाहन उद्योगालाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. पण आॅक्टोबर महिन्यात वाहन विक्रीत दिलासादायक वाढ झाल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनमध्ये राज्यात एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत वाहन विक्री बंद होती. राज्यात १९ जूनपासून आरटीओचे कामकाज सुरू झाले. पण सुरूवातीचे काही दिवस वाहन विक्रीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

मागील चार महिन्यांतच पुण्यात २० लाखांपुढील किंमतीच्या ६७८ कारची विक्री झाली आहे. त्यामध्ये पाऊण कोटींपुढील ३९ कारचा समावेश असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळाली.

जुलै महिन्यापासून वाहन विक्रीत वाढ काहीशा वाढ होऊ लागली. कोरोनामुळे कारची मागणी वाढल्याचे ऑक्टोबर महिन्यातील विक्रीवरून दिसून आले. त्यामध्ये महागड्या कारचाही समावेश आहे. मागील वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत २० लाखांपुढे किंमत असलेल्या ११३६ कारची विक्री झाली होती. त्यामध्ये ९८ कार पाऊण कोटीच्या पुढील होत्या. यंदा जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत २० लाखांपुढील ५४१ कारची नोंद झाली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा जवळपास निम्मा आहे. तसेच ५० लाखांपुढील कारही मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास निम्म्याने विक्री झाल्या आहेत. चार महिन्यांच्या कालावधीत व कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही विक्री झाली आहे. कोरोनामुळे सर्व उद्योग-व्यवसायांना फटका बसला आहे. पण कोरोनापासून बचावासाठी अनेक जण कारला प्राधान्य देत असल्याने ही विक्र वाढत असल्याचे आरटीओ अधिकाºयांचे म्हणणे आहे.
----------------
आरटीओकडे झालेली महागड्या कारची नोंद (एप्रिल ते ऑक्टोबर)
कारची किंमत                        २०१९                      २०२०
२० ते ५० लाखांपर्यंत               ११३६                      ५४१
५० लाखापुढे                           ३२६                        १३६
७५ लाखापुढे                            ९८                          ३९
१ कोटींच्यापुढे                        ५२                            ७
-----------------------------------------
एकुण                                  १४६३                         ६७८
-----------------------------------

Web Title: Expensive cars in Pune even in Corona crisis; Sales of over 20 lakh cars in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.