दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही स्वारगेट आगारात नेमणूक; परिवहन मंत्री सरनाईक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:07 IST2025-09-15T19:07:00+5:302025-09-15T19:07:31+5:30

‘आम्ही विधानसभेत उत्तरे देतो, अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर सुधारणा होईल. अशी अपेक्षा असते. पण, दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा त्याठिकाणी नेमणूक कशी होते,

Even after the suspension of the officers found guilty, they were appointed to Swargate depot; Transport Minister Saranaik is angry | दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही स्वारगेट आगारात नेमणूक; परिवहन मंत्री सरनाईक संतापले

दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही स्वारगेट आगारात नेमणूक; परिवहन मंत्री सरनाईक संतापले

पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही त्यांची पुन्हा स्वारगेट आगारातच नेमणूक केली आहे. याबाबत समजल्यानंतर परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक संतापले. ‘आम्ही विधानसभेत उत्तरे देतो. अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर सुधारणा होईल. अशी अपेक्षा असते. पण, दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा त्याठिकाणी नेमणूक कशी होते,’ अशी विचारणा करत सरनाईक यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यापुढे अशा चुकांची गय केली जाणार नाही. दोषी आढळलेल्या दोन अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले.

प्रताप सरनाईक म्हणाले, फेब्रुवारी २०२५ स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व राज्य हादरून गेले. अशावेळी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. स्वारगेट बसस्थानकावरील वरिष्ठ आगार व्यवस्थापक, कनिष्ठ आगार व्यवस्थापक व दोन सहायक वाहतूक अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आणि त्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली. याबाबतचे निवेदन विधानभवनात मी स्वतः केले. त्यानंतर निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. तत्पूर्वी खात्यांतर्गत विभागीय चौकशी नि:पक्षपाती होण्यासाठी त्यांची बदली अन्यत्र करणे गरजेचे होते. असे असताना प्रादेशिक व्यवस्थापक यांनी त्यांच्या बदल्या अन्यत्र न करता, स्वारगेट येथे नियुक्ती केली. हे नियमाला धरून नाही. त्यामुळे दोषींना आपण पाठीशी घालतोय, असा संदेश समाजात गेला. तसेच विधिमंडळात मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाची घोर फसवणूक झाल्याचेदेखील स्पष्ट दिसून येते. त्यामुळे संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, निलंबनानंतर स्वारगेट बसस्थानकावरच नियुक्ती केलेल्या अधिकारी व पर्यवेक्षकांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्यात येत आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

Web Title: Even after the suspension of the officers found guilty, they were appointed to Swargate depot; Transport Minister Saranaik is angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.