इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 09:35 AM2024-06-11T09:35:25+5:302024-06-11T09:37:12+5:30

घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून यात अनेकांचे देणे - घेणे त्यांनी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे

Estate agent youth shot dead Incident at Narhe | इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना

इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे एका रिअल इस्टेट एजंटाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उशिरा उघडीस आली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयूर सुनील नरे (वय ३१, रा. जांभूळवाडी, आंबेगाव, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, नऱ्हे येथील सेवा रस्त्यालगत असलेल्या सिद्धिविनायक अंगण सोसायटी येथे काव्या ग्रुप म्हणून मयूर नरे यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. ते काही बांधकाम प्रकल्पाची कामे करत होते, तसेच इस्टेट एजंट म्हणूनही काम करायचे. शनिवारी ते कार्यालयात गेले, रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या भावाने रात्री उशिरा त्यांच्या कार्यालयात जाऊन पाहिले असता मयूर यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले. मयूर यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून यात अनेकांचे देणे - घेणे त्यांनी लिहून ठेवले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव करीत आहेत.

 

Web Title: Estate agent youth shot dead Incident at Narhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.