ससूनमधून पुन्हा पलायन; स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

By विवेक भुसे | Updated: February 11, 2024 12:22 IST2024-02-11T12:20:54+5:302024-02-11T12:22:23+5:30

आरोपीने चार दिवसांपूर्वी स्वाती मोहोळ यांच्याविषयी शिवीगाळ करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या

Escape again from Sassoon The accused who threatened Swati Mohol ran away from the hands of the police | ससूनमधून पुन्हा पलायन; स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

ससूनमधून पुन्हा पलायन; स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

पुणे : गॅंगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळून गेल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर (वय २४, रा. आकुर्डी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्या पलायनपासून ससून रुग्णालय वारंवार चर्चेत येत आहेत. ससून रुग्णालयातून रविवारी सकाळी आरोपीच्या पलायनाने पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे. 

चार दिवसांपूर्वी स्वाती मोहोळ यांच्याविषयी शिवीगाळ करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. त्याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद मोहोळ यांच्या खूनामधील कट कारस्थान लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

सायबर पोलिसांनी त्याला ९ फेब्रुवारीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर त्याला विश्रामबाग पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. रात्री त्याने छातीत खूप दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना तो बंदोबस्तावरील पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Web Title: Escape again from Sassoon The accused who threatened Swati Mohol ran away from the hands of the police