शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ते गोवा सायकल प्रवासातून पर्यावरणाचा संदेश;अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढविण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 20:08 IST

१७ जणांनी एकत्र येत सायकलवरुन पुणे ते गोवा (कोस्टल मार्ग) असा ५५५ किमीचा प्रवास करतानाचा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

पुणे : शालेय विद्यार्थी, डॉक्टर, बिल्डर, पोलीस निरीक्षक, माहिती तंत्रज्ञान तज्ञ, उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या १७ जणांनी एकत्र येत सायकलवरुन पुणे ते गोवा (कोस्टल मार्ग) असा ५५५ किमीचा प्रवास करतानाचा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्याचबरोबर सायकलसारख्या वाहनांचा वापर करुन अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. 

कोथरुड येथील अनुसंधा अ‍ॅडव्हेंचर या संस्थेने आयोजित केलेल्या सायकल सफरीत समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, त्यांचा मुलगा गौरांग ताम्हाणे, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या शल्य चिकित्सक स्वप्ना आठवले, उद्योजक अमोल व प्राची उपळेकर, चार्टर्ड अकाऊंटंट विजय अनपट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ डॉ. भीमाप्पा देसाई, अनिकेत जोशी, रणजित, सीमा ननवरे, प्रसाद खांडेकर, शिला नगरकर व त्यांचा मुलगा आकाश नगरकर, सुधा कानडे, निलाक्षी बक्षी या तीन बहिणी अशा विविध क्षेत्रातील सायकलपटूंनी हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. यात वय वर्षे १४ ते ५६ वर्षापर्यंतच्या वयोगटातील विविध क्षेत्रातील १७ सायकलपटू सहभागी झाले होते. 

पुण्यातून ६ डिसेंबर रोजी हा प्रवास सुरु झाला. रोज साधारण १०० पेक्षा अधिक किलोमीटर सायकल चालविणे. नंतर तिथेच एका गावात मुक्काम आणि दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे पुन्हा पुढचा मार्गक्रमण हा त्यांचा नित्य नियम झाला. पुणे - महाड -गुहागर - पावस - देवगड - मालवण - गोवा असा ५५५ प्रवास या गटाने ११ डिसेंबर रोजी पूर्ण केला.

आपल्या सायकल प्रवासात त्यांनी विविध ठिकाणी थांबून सायकल प्रवासाचे महत्व, पर्यावरण पुरकता तसेच दैनंदिन व्यायामाचे महत्व, इकोटुरिझम या गोष्टींचे सध्याच्या काळात असलेले महत्व स्थानिक लोकांपर्यंत पोहचविले. या सायकल प्रवासाविषयी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी सांगितले की, हा एक विलक्षण वेगळा अनुभव होता. या सायकल प्रवासासाठी गेल्या ४ महिन्यांपासून तयारी करीत होतो. या उपक्रमासाठी सुट्टी मिळावी, म्हणून दिवाळीत सुट्टी नको असे पोलीस उपायुक्त कविता नारनवरे यांना सांगितले होते. त्यांनीही तातडीने या उपक्रमासाठी सुट्टी मंजूर केली. त्यामुळेच हे शक्य झाले. 

गेल्या ४ महिन्यांपासून शनिवार, रविवार भोर, लवासासह शहरालगतच्या विविध घाटापर्यंत सायकल चालविण्याचा सराव करीत असे. या प्रवासातच चढाच्यावेळी कोणता गिअर वापरावा, उताराच्या वेळी कोणता गिअर वापरावा याचे मार्गदर्शन १४ वर्षाच्या मुलाकडून मिळाले. चढावर सायकल चालविताना मोठे कष्ट घ्यावे लागतात. तर उतार आल्यावर सायकल चालविण्याची मौज वेगळीच असते. जीवनातही तसेच आहे. जीवनात संघर्षाचे अनेक प्रंसग येतात. त्यातून निभावून जाण्यासाठी मोठी कष्ट करावे लागतात. मात्र चांगले दिवसही येत असतात़ त्याचा आनंद घ्यायचा असतो. जीवनाचे हे तत्वज्ञान सायकल प्रवासात मुलाच्याही मनावर बिंबविण्यात यश आले, याचा आनंदही मिळाला, असे विष्णु ताम्हाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण