जुलैअखेर वर्गखोल्यांचे भाडे मिळणार

By Admin | Updated: June 11, 2015 06:04 IST2015-06-11T06:04:26+5:302015-06-11T06:04:26+5:30

जिल्ह्यातील ७०९ वर्गखोल्यांच्या भाड्यापोटीचे थकीत सुमारे ३ कोटी ८१ लाख रुपये जुलैअखेर त्या संस्था व मालकांना देण्यात येतील, असे आश्वासन

At the end of July, classes will be available for classrooms | जुलैअखेर वर्गखोल्यांचे भाडे मिळणार

जुलैअखेर वर्गखोल्यांचे भाडे मिळणार

पुणे : जिल्ह्यातील ७०९ वर्गखोल्यांच्या भाड्यापोटीचे थकीत सुमारे ३ कोटी ८१ लाख रुपये जुलैअखेर त्या संस्था व मालकांना देण्यात येतील, असे आश्वासन
जिल्हा परिषद शिक्षण मंडळाचे उपशिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी दिले.
सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी वरील आश्वासन दिले. लोकमतने वर्गखोल्यांचे भाडे थकल्याने संस्थामालक शाळांना टाळे ठोकण्याच्या तयारीत, असे वृत्त रविवारी (७ जून) प्रसिद्ध केले होते. सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत काही सदस्यांनी याचा जाब विचारला. ग्रामपंचायती, खासगी संस्थांनी शाळांच्या मुख्याध्यापकांकडे भाडे देण्यासाठी तगादा लावला आहे. तर, अनेक ठिकाणी संबंधित शाळांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या वर्गखोल्यांचे थकीत भाडे त्वरित देण्यात यावे; अन्यथा त्या ठिकाणच्या शाळांना कुलूप ठोकण्यात येईल, असा पवित्रा अनेक ग्रामपंचायती व खासगी संस्थांनी घेतला आहे. यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये शिक्षणाचा प्रश्न गंभीर होण्याची स्थिती आहे.
सदस्यांनी सभेत याबाबत आवाज उठविल्यानंतर उपशिक्षणाधिकारी कुऱ्हाडे यांनी, ७०९ वर्गखोल्यांचे ३ कोटी ८१ लाख रुपये थकीत असल्याचे कबूल केले. अनुदान निर्धारणाचे काम झाले नव्हते. ही प्रक्रिया तीन वर्षे प्रलंबित होती. त्यामुळे शासनाकडून हे पैसे मिळाले नव्हते. आता अनुदान निर्धारणाचे २०१२-१३पर्यंत काम झाले असून, या शाळांच्या थकीत भाड्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. ३१ जुलैपर्यंत ही थकीत रक्कम मिळेल. संस्थांनी या अश्वासनावर विश्वास ठेवून शाळा खुली करावी. विद्यार्थ्यांची अडचण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: At the end of July, classes will be available for classrooms