पुणे: सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करताय आणि तुमच्याकडे रिक्षा परवाना असेल तर तत्काळ रिक्षा परवाना स्वेच्छेने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावा. अन्यथा मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.
शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोईसाठी राज्य परिवहन विभागाकडून खासगी वाहतुकीसाठी रिक्षाला परमिट दिले जाते. मोटार व्हेईकल ॲक्टनुसार हे परवाने दिले जातात. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रिक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओने २०१७ मध्ये नवीन रिक्षांना परवाने देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अनेकांना व्यवसाय मिळाला. अनेकांनी रिक्षा घेऊन परवाने घेतले. त्यामुळे रिक्षांमध्येही स्पर्धा निर्माण झाली. शहरात सध्या ८३ हजारांपेक्षा जास्त रिक्षा परवाने आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ४० हजारांहून अधिक रिक्षा परवाने दिले आहेत. शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार ऑटोरिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत नसावा ही अट आहे. रिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येते.
रिक्षा परवाना घेताना तो कोठेही नोकरी करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिलेले असते. परवाना घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यास त्याने रिक्षा परवाना परत करणे आवश्यक आहे. नोकरी करत असलेल्या व्यक्तींनी त्यांच्याकडील रिक्षा परवाना तत्काळ जमा करावा. - स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
Web Summary : Pune RTO warns employed auto permit holders to surrender permits immediately. Action will be taken against those employed when obtaining the permit. Permits were issued to provide livelihood in 2017, now city has over 83,000 auto permits.
Web Summary : पुणे आरटीओ ने नौकरीपेशा ऑटो परमिट धारकों को तुरंत परमिट सरेंडर करने की चेतावनी दी है। परमिट प्राप्त करते समय नौकरी करने वालों के खिलाफ कार्रवाई की जाएगी। 2017 में आजीविका प्रदान करने के लिए परमिट जारी किए गए थे, अब शहर में 83,000 से अधिक ऑटो परमिट हैं।