शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत रमजान ईद उत्साहात

By admin | Updated: June 27, 2017 07:17 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी असलेल्या मस्जिद ईदगाह मैदान वर रमजान

लोकमत न्यूज नेटवर्कनेहरूनगर : पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी असलेल्या मस्जिद ईदगाह मैदान वर रमजान ईद ची ईदुल फित्र ची नमाज अदा करून मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, कुदळवाडी, काळेवाडी, नेहरूनगर, मोरवाडी, खराळवाडी, मासुळकर कॉलनी आदी परिसरातील मस्जिद ईदगाह मैदान वरती सकाळी ९ च्या सुमारास हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची ईद-उल-फित्र ची नमाज अदा केली. नमाज पठाणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर अनेक मुस्लीम बांधवांनी रमजान ईद निमित्त शिरखुर्मा हा सुक्या मेव्यापासून तयार केलेल्या गोड पदार्थाची मेजवानी देऊन मोठ्या उत्साहात ईद साजरी केली. ईदनिमित अनेक मुस्लिम बांधवांनी गोर गरीब नागरिकांना जकात फित्रा चे वाटप केले.पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या नेहरूनगर येथील ईदगाह मैदानावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता मौलाना आझाद व मौलाना हाफिज यांनी रमजान ईदनिमित्त ईदुल फित्र ची २ रखात नमजाचे पठण करून मुस्लिम बांधवांना रमजान ईद चे महत्त्व सांगितले. या वेळी नेहरूनगर, संततुकारामनगर, वल्लभनगर, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, बालाजीनगर, यशवंतनगर, फुलेनगर, गवळीमाथा आदी परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे रमजान ईद ची ईद-उल-फित्र ही नमाज अदा केली. अल्लाजवळ सर्व नागरिकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना (दुवा) केली. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड मुस्लिम वेलफेयर अँड कब्रस्थान ईदगाह कमिटी चे अध्यक्ष ए़ बी़ शेख, फारूक इनामदार, जिलानी मुलानी, नादिर शेख, कादर शेख, जिलाणी शेख, मीरा तराजगार, जाकीर शेख आदींनी केले होते.या वेळी माजी महापौर हनुमंतराव भोसले, नगरसेवक राहुल भोसले, माजी महापौर वैशाली घोडेकर, लोंढे आदी मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र विभांडिक, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, यांच्या सह ३० पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सांगवीमध्ये कार्यक्रम-सांगवी : परिसरातील श्रुष्टी चौक, दापोडी रोडवरील आणि जुनी संगवीतील ईदगाह स्थानी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.