बारामतीतून उड्डाण केलेल्या शिकाऊ विमानाचे इंदापूरमधील कडबनवाडीत ‘इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 13:07 IST2022-07-25T13:00:12+5:302022-07-25T13:07:40+5:30
Plane Emergency landing In Pune: बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या शिकाऊ विमानाचे कडबनवाडी(ता.इंदापुर) येथे ‘इमर्जन्सी लँडिंग’ करण्यात आले.यामध्ये विमान चालविणाऱ्या महिला पायलट सुरक्षित आहेत.

बारामतीतून उड्डाण केलेल्या शिकाऊ विमानाचे इंदापूरमधील कडबनवाडीत ‘इमर्जन्सी लँडिंग
बारामती - बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या शिकाऊ विमानाचे कडबनवाडी(ता.इंदापुर) येथे ‘इमर्जन्सी लँडिंग’ करण्यात आले. यामध्ये विमान चालविणाऱ्या महिला वैमानिक भाविका राहुल राठोड ह्या सुरक्षित आहेत. त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्व्हर एव्हिएशनच्या या विमानाने बारामतीमधून सकाळी उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच इंदापूरमधील कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात अचानक या विमानाचे लॅडिंग करण्यात आले. विमान कोसळल्याचे समजून अनेकांनी अपघातग्रस्त विमान पाहण्यासाठी धाव घेतली.बारामती येथील कार्व्हर एव्हिएशनचे हे विमान आहे.या संस्थेमार्फत वैमानिक प्रशिक्षण दिले जाते.
यादरम्यान, विमानातील महिला वैमानिक भाविका राहुल राठोड ह्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विमान शेतात पडल्याचे पाहताच आसपासच्या तरुणांनी या ठिकाणी धाव घेतली.यातील शिकाऊ महिला पायलटला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले आहे.मात्र, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बारामती येथून अधिकारी आणि सबंधित संस्थेचे अधिकारी वर्ग या ठिकाणी पोहचले आहेत.दरम्यान हे विमान कोसळलेले नसून विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.