शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाबरोबरच पात्रताही महत्त्वाची

By admin | Updated: January 25, 2017 01:24 IST

‘‘जिद्द व नैतिकतेच्या बळावर अडथळ्यांवर मात करता येते. यामुळे आपल्या स्वप्नातील विश्व साकार करता येते. फक्त इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले

नारायणगाव : ‘‘जिद्द व नैतिकतेच्या बळावर अडथळ्यांवर मात करता येते. यामुळे आपल्या स्वप्नातील विश्व साकार करता येते. फक्त इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले, म्हणून इंजिनिअरिंगमध्ये करिअर करता येते असे नाही तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करीत राहिल्यास काहीही अशक्य नाही. आपले ध्येय गाठण्यासाठी त्याचा ध्यास उराशी बाळगून काम करीत राहावे. शिक्षण जेवढे महत्त्वाचे त्यापेक्षा पात्रता अधिक महत्त्वाची असते,’’ असे प्रतिपादन लायन्स इंटरनॅशनल क्लबचे एम. जे. एफ. ला. हेमंत नाईक यांनी कुरण येथे केले. कुरण येथील जयहिंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचा पदवीग्रहण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी जयहिंद शैक्षणिक संकुलाचे संस्थापक-अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स इंटरनॅशनल क्लबचे एम. जे. एफ. ला. हेमंत नाईक उपस्थित होते. जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीग्रहण समारंभामध्ये ३५० विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली.हेमंत नाईक म्हणाले, की चेतन भगत हे इंजिनिअर असूनही लिखाणामधून आपले करिअर केले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेली व्यक्ती दुधाचा उत्तम व्यापार करते. यामधून हे दिसून येते, की माणसाने आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व ध्येयासाठी लढावे. उद्दिष्टे गाठण्यासाठी गुरूंचे कार्य मौल्यवान असते.तात्यासाहेब गुंजाळ म्हणाले, की विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात आपले करिअर करावे. सध्या आपल्या देशात व्यवसायासाठी पूरक वातावरण आहे, याचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा.या वेळी व्ही. आर. डी. ई.चे माजी संचालक डॉ. सी. एल. धमेजानी संस्थेचे संचालक एन. एम. काळे, जितेंद्र गुंजाळ, संदीप मुथ्था, संतोष सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. जाधवर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य योगेश गुंजाळ, सर्व विभागप्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)