शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी पुन्हा एल्गार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2015 02:02 IST

बारामती तालुक्यातील लोणी भापकरसह २२ जिरायती गावांनी पुरंदर योजना कार्यान्वित करावी, चारा डेपो सुरू करावेत, यासह इतर मागण्यांसाठी पुन्हा

लोणी भापकर : बारामती तालुक्यातील लोणी भापकरसह २२ जिरायती गावांनी पुरंदर योजना कार्यान्वित करावी, चारा डेपो सुरू करावेत, यासह इतर मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आठ शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून लोणी पाटीवर उपोषणास प्रारंभ केल्याने या गावातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ५० वर्षे सत्तेत राहिलेल्यांनी वेळोवेळी आश्वासने दिली. शिवार मात्र तहानलेलाच राहिला. ‘अच्छे दिन’चे आशा दाखविणारे नवीन राज्यकर्ते तरी या भागाची तहान भागविणार का, असा सवाल त्यांनी केला आहे.हनुमंत भापकर, मुरलीधर ठोंबरे, विजय बारवकर, रावसाहेब चोरमले, तात्याराम जायपत्रे, मोहन जगदाळे, तानाजी कोळेकर, रमेश भापकरअशी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. पावसाअभावी पिण्याच्या पाण्यासह दारातील जित्रांबांना चारा आणायचा कोठून, यामुळे लोणी भापकर, मोरगाव, तरडोली, मासाळवाडी, पळशी, मुर्टी, मोढवे, कानाडवाडी, मुढाळे, सायंबाचीवाडी, माळवाडी, जळगाव क. प., बाबुर्डी, काऱ्हाटी, जळकेवाडी, चोपडज, भिलारेवाडी आदी गावांतील शेतकरी हतबल झाला आहे. सलग चार वर्षे पावसाने हुलकावणी दिल्याने या भागातील पिण्याचे पाणी व चाऱ्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यातच पुरंदर योजना सुरू होऊन पाझर तलाव भरावेत, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने या गावांनी उपोषणाचे हत्यार उपसले असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. ज्या गावांना मोरगाव प्रादेशिकचे पाणी मिळते ते अपुरे व गढूळ आहे. त्यातून आजारांचे प्रमाण वाढत आहे. टँकरची संख्या अपुरी असल्याने वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर असल्याची व्यथा ग्रामस्थ मांडत आहेत. जुनी वैरण संपली, शेतात चाराच नाही. त्यामुळे दारातील जित्राबं जगवायची कशी, अशा विवंचनेत हा भाग सापडल्याचे चित्र आहे. पावसाने ओढ देताच वर्षानुवर्षे या भागात अशीच टंचाई स्थिती उद्भवत असल्याने अनेकांनी बागायती भाग किंवा शहराकडे स्थलांतर केले आहे.