पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींसाठी आज पासून निवडणुकीचा रणसंग्राम 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 02:34 PM2020-12-23T14:34:31+5:302020-12-23T14:35:24+5:30

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार पासून सुरूवात, जिल्ह्यात 16 लाख 46 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Election battle for 746 gram panchayats in Pune district from today | पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींसाठी आज पासून निवडणुकीचा रणसंग्राम 

पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींसाठी आज पासून निवडणुकीचा रणसंग्राम 

Next
ठळक मुद्देराज्यात कोरानामुळे गेल्या आठ-दहा महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. यात पुणे जिल्ह्यात तब्बल 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील तब्बल 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. या निवडणुकीसाठी उमेवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार (दि.23) पासून सुरूवात होत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल 16 लाख 46 हजार 563 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात प्रथमच मतदार करणा-या तरुण मतदारांची संख्या सुमारे दीड लाखांच्या पुढे आहे. 

राज्यात कोरानामुळे गेल्या आठ-दहा महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. यात पुणे जिल्ह्यात तब्बल 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. निम्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या एकाच वेळी होणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू केली आहे. यात 746 ग्रामपंचायतींमध्ये तब्बल 6 हजार 980 सदस्यासाठी ही निवडणूक होत आहे. एकाच वेळी ऐवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने संपूर्ण महसूल यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत असल्याने स्थानिक पातळीवर सर्व तहसिलदारांना विशेष खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

- जिल्ह्यात निवडणुका होणा-या ग्रामपंचायती : 746
- एकूण सदस्य संख्या : 6980
- एकूण प्रभागांची संख्या : 2691
- एकूण मतदान केंद्रे : 3008 
------
- पुरूष मतदार : 8 लाख 59 हजार 996
- स्त्री मतदार : 7 लाख 86 हजार 559
- यावेळी पहिल्यांदा मतदान : 1 लाख 65 हजार 
------
निवडणूक लढवणा-या उमेदवाराला द्यावा लागणार खर्चाचा हिशेब 

जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून, निवडणूक लढविणा-या प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी उमेदवार अर्ज दाखल करताना कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँक, शेड्युल बँक, सहकारी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे व या बँक खात्यातूनच सर्व खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये 7-9 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत प्रत्येकी 25 हजार , 11-13 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींना 35 हजार आणि 15-17 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत 45 हजार रुपये खर्चांची मर्यादा निश्चित केली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी हे नक्की करा ! (बॉक्स) खर्चाच्या तपशीलासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेत नवीन खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे. उमेदवारांसाठी अशा काय सूचना आहेत त्याचा तपशील.
 

Web Title: Election battle for 746 gram panchayats in Pune district from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.