शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या लवकरच निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 14:23 IST

जिल्ह्यात एकूण १४०७ ग्रामपंचायती

ठळक मुद्देप्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीरसंबंधित तहसीलदाराने गुगलमॅपद्वारे प्रथम गावाचे नकाशे अंतिम करण्यास

पुणे : जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे तब्बल ७५० ग्रामपंचायतींसाठी लवकरच निवडणुका होणार असून, या ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यात २० डिसेंबरपासून प्रभागरचना आणि आरक्षण निश्चित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार संबंधित तहसीलदाराने गुगलमॅपद्वारे प्रथम गावाचे नकाशे अंतिम करण्यास सांगण्यात आले आहे.        जिल्ह्यात एकूण १४०७ ग्रामपंचायती असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक ७५० ग्रामपंचायतींसाठी जुलै -ऑगस्ट २०२० मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी या सर्व ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना व आरक्षण जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये २० डिसेंबर रोजी गावाचे नकाशे अंतिम करणे, ३० डिसेंबरपूर्वी संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे स्थळपाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे व अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण निश्चित करणे, १० जानेवारीला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता देणे, २० जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांची नमुना ब प्रसिद्ध करणे, ३० जानेवारी रोजी प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता देणे, १ फेब्रुवारी रोजी आरक्षणाची सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना देणे, प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे आणि २१ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने अंतिम प्रभागरचना व आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. 

जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तालुकानिहाय संख्या :

हवेली -५५, आंबेगाव-३०, बारामती-४९, भोर-७४, दौंड-५०, इंदापूर-६१, जुन्नर-६७,मावळ-५७, मुळशी-४५, पुरंदर-६६, खेड-९१, शिरूर-७३, वेल्हे-३१, पिंपरी-चिंचवड-१ एकूण - ७५०.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक