पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा केला खून; सोरटेवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 12:51 IST2025-04-06T12:50:41+5:302025-04-06T12:51:40+5:30

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावाच्या हद्दीत रात्री एका २७ वर्षीय तरुणाचा धारदार शास्त्राने वार करत खून केल्याची घटना ...

Elderly man murdered by stabbing with a sharp weapon; Incident in Sortewadi | पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा केला खून; सोरटेवाडी येथील घटना

पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा केला खून; सोरटेवाडी येथील घटना

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावाच्या हद्दीत रात्री एका २७ वर्षीय तरुणाचा धारदार शास्त्राने वार करत खून केल्याची घटना घडली आहे.  रोहित गाडेकर वय २७ रा. मासाळवस्ती-सोरटेवाडी ता. बारामती असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ही घटना काल दि. ५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित गाडेकर व सोरटेवाडी येथील माने (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यात पैशांच्या देवाणघेवाण वरून वाद होता.

यातूनच काल रात्री सोरटेवाडी (कुलकर्णी चारी) येथे आरोपींची रोहित गाडेकर यांच्या छातीवर व मानेवर धारदार शास्त्राने वार केले.यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास करंजेपुल पोलिस चौकीचे उसपोनि राहुल साबळे करत आहेत.

Web Title: Elderly man murdered by stabbing with a sharp weapon; Incident in Sortewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.