शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:03+5:302021-01-08T04:31:03+5:30

जि. प. प्राथमिक शाळा पारगावतर्फे खेड येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रशिक्षण व केंद्रप्रमुख विजय सुरकुले यांचा सदिच्छा समारंभ याचे ...

Educational Quality Development Training | शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रशिक्षण

शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रशिक्षण

जि. प. प्राथमिक शाळा पारगावतर्फे खेड येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रशिक्षण व केंद्रप्रमुख विजय सुरकुले यांचा सदिच्छा समारंभ याचे उदघाटन जि. प. सदस्या अरुणा थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी तोडकर बोलत होत्या. यावेळी सरपंच सचिन पानसरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर पवळे, भैरवनाथ प्रेप स्कूल अध्यक्ष रमेश सावंत, शिक्षक पालक संघ अध्यक्ष महेंद्र कड्सकर, शंकरनाना सावंत, सरपंच राजेंद्र टाकळकर, सुनील कडूसकर, सुरेश भागडे, केंद्रप्रमुख कल्पना टाकळकर, मुख्याध्यापक विजय घिसे व कारेगाव केंदातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते .

यावेळी सरपंच सचिन पानसरे, कल्पना टाकळकर, तुकाराम पोटे, वसंत नाटे, सुमेधा चासकर यांनी मनोगते व्यक्त केली .अरुणा थोरात यांनी पारगाव शाळेला दोन सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझर भेट दिले व दुरुस्तीसाठी दोन लक्ष निधी देण्याचे जाहीर केले.

शैक्षणिक गुणवत्ता प्रशिक्षणास तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कामिनी थोरात व सुनंदा भांगे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची व्यवस्था स्मिता तळेकर, वंदना चासकर, उज्ज्वला पडवळ, गौरी खेडकर, सुरेखा तोडकर यांनी पाहिली. प्रास्ताविक संदीप मनकर, सूत्रसंचालन विजय घिसे तर आभार सुरेश भागडे यांनी मानले.

Web Title: Educational Quality Development Training