पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हे विमान व्हीएसआर या खासगी कंपनीचे होते. त्यामध्ये अजित दादा पवार, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या चार जणांमध्ये शांभवी पाठक कोण होत्या? त्याबाबत माहिती समोर आली आहे. शांभवी पाठक यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले होते. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एरोनॉटिक्स आणि एव्हिएशन सायन्स या विषयात बीएससी पदवी प्राप्त केली होती. पायलट होण्यासाठी शांभवी पाठक यांनी न्यूझीलंडमधील न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमी येथून कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण घेतले. २०१८ ते २०१९ या कालावधीत त्यांनी तेथे व्यावसायिक उड्डाणाचे (प्रोफेशनल फ्लायिंग) प्रशिक्षण पूर्ण केले. याच प्रशिक्षणादरम्यान त्यांना न्यूझीलंड सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी कडून कमर्शियल पायलट लायसन्सही मिळाले होते.
अजित पवारांचे विमान मुंबईवरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेक ऑफ झाले होते. तर बारामतीत ते ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होत असताना हा भीषण अपघात घडला. त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात कोसळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. त्यामध्ये अजितदादांसोबत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Web Summary : A plane crash in Baramati killed Deputy CM Ajit Pawar and four others, including Captain Shambhavi Pathak. Pathak, educated in Mumbai and trained in New Zealand, was a commercial pilot. The plane crashed during landing due to technical issues.
Web Summary : बारामती में एक विमान दुर्घटना में उपमुख्यमंत्री अजित पवार और कैप्टन शांभवी पाठक सहित चार अन्य लोगों की मौत हो गई। पाठक ने मुंबई में शिक्षा प्राप्त की और न्यूजीलैंड में प्रशिक्षण लिया। तकनीकी खराबी के कारण विमान लैंडिंग के दौरान दुर्घटनाग्रस्त हो गया।