शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील तलावांना प्रदूषणाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:55 IST

सांडपाणी, कचऱ्यामुळे तलावातील जीवसृष्टी धोक्यात; डबक्यात होईल रूपांतर

पुणे : पुण्याची ओळख व शहराच्या सौंदर्यामध्ये भर टाकणाºया शहरातील कात्रज अप्पर तलाव, स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथील तलाव आणि पाषाण तलाव प्रचंड प्रमाणात वाढलेला कचरा व सांडपाण्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामुळे तलावातील जीवसृष्टी व येथे येणाºया पक्ष्यांचे जीवनच धोक्यात आल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात स्पष्ट केले आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर या तलावांचे सांडपाण्याच्या डबक्यांमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही.कात्रज परिसराच्या आजूबाजूच्या टेकड्यांवरून वाहत येणारे पावसाचे पाणी पेशवेकालीन तलावामध्ये साचते. स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथील एकूण ३० एकर क्षेत्र असलेल्या लोअर तलाव व त्याच्या दक्षिणेस एकूण १४ एकर क्षेत्र असलेला अप्पर तलाव अशा दोन स्तरांवर कात्रज तलाव विभागला गेला आहे.अप्पर तलावातील पाणी लोअर तलावामध्ये सोडले जाते. तर पाषाण तलावाकडे देखील पुण्याच्या वैभवामध्ये भर टाकणारा तलाव म्हणून पाहिले जात असून, येथे हिवाळ्यामध्ये देश-विदेशातून स्थलांतरण करणारे अनेक पक्षी दरवर्षी येतात. ही पुणेकरांसाठी एक मोठी पर्वणी असते. परंतु गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या शहरीकरणामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे या तलावांचे अस्तित्वच धोक्यात आले.कात्रजच्या दोन्ही तलावांमध्ये आजूबाजूच्या परिसरातून येणाºया पाण्यात प्रचंड प्रमाणात सांडपाणीमिश्रित पाणी येते. तसेच या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात कचरादेखील तलावामध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे.‘डीओ’चे प्रमाण घटलेपाषाण तलावामध्येदेखील हीच परिस्थिती आहे. यामुळे या तिन्ही तलावांमध्ये प्राणवायू म्हणून ओळखल्या जाणाºया पाण्यात विरघळणारा आॅक्सिजनचे (डीओ) प्रमाण गेल्या दोन वर्षांत झपाट्याने कमी होत असल्याचे पर्यावरण अहवालात स्पष्ट केले आहे. तर पाण्यातील रासायनिक पदार्थांच्या प्रदूषणाचा मापदंड म्हणून सीओडीचा वापर केला जातो.केमिकल आॅक्सिजन, बायोकेमिकल आॅक्सिजन या सर्वच पातळ्यांवर तलावांमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे हा तलाव मोठ्या जलपर्णीच्या विळख्यात आला असून, जीवसृष्टी धोक्यात आली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणPuneपुणेWaterपाणीpollutionप्रदूषण