शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

गावाचा विकास हे मतदाराचे कर्तव्य

By admin | Updated: January 25, 2017 23:46 IST

लोकशाहीला भक्कम करण्यासाठी प्रत्येक मतदाराने जागृत होणे आवश्यक आहे. मतदान करणे हे आपले दायित्व समजून सर्व मतदारांनी मतदानासाठी पुढे आले पाहिजे

घोडेगाव : लोकशाहीला भक्कम करण्यासाठी प्रत्येक मतदाराने जागृत होणे आवश्यक आहे. मतदान करणे हे आपले दायित्व समजून सर्व मतदारांनी मतदानासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मतदान जनजागृती दिनानिमित्त शिनोली (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर विद्यामंदिर व टी. एस. बोराडे महाविद्यालयाने काढलेल्या रॅलीला मार्गदर्शन करताना केले. या महाविद्यालयाने मतदान जनजागृती दिनानिमित्त रांगोळी, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. सकाळी संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते झाली. या वेळी प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटशिक्षणाधिकारी रामदास पालेकर, नायब तहसीलदार विजय केंगले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मधुकरअप्पा बोऱ्हाडे, शंकरशेठ शहा, उपसरपंच सुनील बोऱ्हाडे, प्राचार्य डी. डी. जाधव हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. १२ वीच्या काही मुलामुलींना पहिल्यांदा मतदान करण्याचा अधिकारी प्राप्त झाला आहे. त्यांनी आज मतदान ओळखपत्र घेताना, निवडणुकीमध्ये योग्य उमेदवाराची निवड करणे, कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडणे, मतदानाचा हक्क बजावणे, तालुका व गावाचा विकास करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य असल्याचे लक्षात ठेवले पाहिजे.’’ या वेळी पहिल्यांदाच मतदार यादीत नाव समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्र देण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बक्षीस मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली. (वार्ताहर)