शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभाऱ्यांच्या निवडीसाठी उडणार धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

निवडणूकीचे चित्र स्पष्ट : अनेक ग्रामपंचायती बिनविरोध तर काही गावात होणार चुरशीच्या लढती, प्रचाराचा नारळ फुटणार लोकमत न्यूज नेटवर्क ...

निवडणूकीचे चित्र स्पष्ट : अनेक ग्रामपंचायती बिनविरोध तर काही गावात होणार चुरशीच्या लढती, प्रचाराचा नारळ फुटणार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींचे चित्र सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले. निवडणुक लागलेल्या या ग्रामपंचायतींपैकी काहींनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार बिनविरोध केल्या. मात्र, अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणुकी लागल्या आहेत. गावकारभाऱ्यांच्या निवडीचा फड यामुळे रंगणार आहे. अनेक इच्छूकांनी आपले पॅनल रणधुमाळीत उभे केल्याने काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती पाहायला मिळणार आहे. सरंपंचपदाचे आरक्षण अजुन जाहिर झाले नसले तरी काहींनी नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. १५ जानेवारीला निवडणुका होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघणारआहे.

जिल्ह्यातील १४०० ग्रामपंच्यातींपैकी काही ग्रामपंचयातींची मुदत ही डिंसेंबर महिन्यात संपली. या निवडणुका गेल्या वर्षी होने अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे निवडणुक कार्यक्रम जाहिर होण्यास उशीर लागला. यामुळे मुदत संपलेल्या ७४८ ग्रामपंचायतींवर प्रशासन नेमण्यात आले. यामुळे निवडणुक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुक आयोगाने ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहिर करत जानेवारीच्या १५तारखेला निवडणुक घोषित केल्या. यासाठी आरक्षण घेण्यात आल्याने अनेक इच्छुकांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने अनेकांच्या इच्छा मावळल्या होत्या. असे असले तरी आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली. २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ३१ जानेवारी रोजी छाननीत अनेकांचे अर्ज बाद झाले. निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत अर्ज माघारीच्या दिवशी सोमवारी अनेकांनी अर्ज मागे घेत निवडणुका बिनविरोध केल्या. मात्र, अनेक बड्या ग्रामपंचयातीत सत्ताधारी आणि विरोधकांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने निवडणुका लागल्या आहेत.

निवडणुक रिंगणात अनेक मातब्बर असल्याने या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. प्रचाराचा नारळ फाेडत पॅनल प्रमुखांनी सोमवारीच प्रचाराचा शुभारंभ केला. यामुळे येत्या १० दिवसांत गावातील राजकारण ढवळुन निघणार आहे. मंगळवार पासुन गावात कोपरा सभा, रोड शो, निवडणुक रॅल्या काढत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवार करणार आहेत.

चौकट

प्रचारासाठी राबणार हायटेक यंत्रणा

अनेक ग्रामपंचयातीत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे उमेचारांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. एरवी खासदार, आमदारकीच्या निवडणुकांत हायटेक यंत्रणेचा वापर उमेदवारांमार्फत केला जात होता. मात्र, ग्रामपंचयात निवडणुकांतही उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हायटेक यंत्रणांचा वापर करणार आहेत. यात सोशल मिडियाला प्राधान्य उमेदवारांनी दिला आहे. गेल्या वर्षात गावाच्या विकासाची उदाहरणे देत रखघडलेल्या कामांचा पंचनामा करत गावविकासासाठी अनेक योजनाही या माध्यमातून उमेदवारांपर्यंत पोहचवील्या जात आहेत.

चौकट

रात्री उशीरा पर्यंत सुरू होती प्रक्रीया

जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायतींच्या अर्ज माघारीची प्रक्रिया सोमवारी पार पडली. सकाळ पासुन सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत तालुक्याच्या ठीकाणी सुरू होती. यामुळे किती ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या याचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही.