Narendra Modi: काँग्रेस काळात प्रकल्पांचे केवळ भूमिपूजनचं मात्र काम.., नरेंद्र मोदींचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 13:59 IST2022-03-06T13:58:57+5:302022-03-06T13:59:10+5:30
नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर टीका करण्याची संधी साधली.

Narendra Modi: काँग्रेस काळात प्रकल्पांचे केवळ भूमिपूजनचं मात्र काम.., नरेंद्र मोदींचा काँग्रेसला टोला
पुणे : पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण, गरवारे ते आनंदनगर मेट्रोचे उदघाटन आणि इ बस सेवेचे उदघाटन असे कार्यक्रम झाले. त्यानंतर एमआयटीच्या प्रांगणात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदींनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
मोदी म्हणाले, या मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यासाठी मला बोलविले होते. आता तिचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले. काँग्रेस सरकारच्या काळात भूमीपूजन होत होते. पण तो प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे. वेळेवर प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, हे मेट्रोने दाखवून दिले असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे.
''आज बारापेक्षा जास्त शहरात मेट्रो काम चालू आहे. त्यात महाराष्ट्र जास्त आहेत. मुबंई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक इकडे मेट्रो सुरू होतेय. लोकांना आग्रह जे मोठे लोक समाजात आपण मानतो त्यांना आग्रह की मेट्रो प्रवास सवय लावा जेवढा जास्त मेट्रो प्रवास तेवढी शहराला मदत होईल. तसेच जास्तीत जास्त ई वाहतूक सुरू झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.''
महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सेनानी यांना मोदींकडून श्रद्धांजली
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वी अनेकांच्या कामाने पावन झालेल्या पुणेकरांना नमस्कार करत आहे. देश स्वतंत्र अमृतमहोत्सव साजरा करतोय. पुण्याच विशेष महत्व आहे. यामध्ये लोकमान्य ,टिळक चाफेकर बंधू असे स्वातंत्र्य सेनानी यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.