शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
2
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
3
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
5
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
6
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
7
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
8
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
9
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
10
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
11
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
12
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
13
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
14
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
15
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
16
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
17
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
18
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
19
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
20
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
Daily Top 2Weekly Top 5

गावविकासात खोडा

By admin | Updated: May 25, 2015 05:51 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींच्या हद्दीतील इमारतींवरील करआकारणी करण्यास शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्थगिती दिल्याने गावांच्या उत्पन्नावर गदा आली

पिंपरी : न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींच्या हद्दीतील इमारतींवरील करआकारणी करण्यास शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्थगिती दिल्याने गावांच्या उत्पन्नावर गदा आली आहे. परिणामी गावांच्या विकासासाठी निधी उभा करण्यात मोठा अडसर झाल्याने गावगाडा कसा हाकायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे करवसुलीस असणाऱ्या या स्थगितीबाबत ग्रामस्थ, तसेच गावपुढाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या ग्रामपंचायतींकडून हद्दीप्रमाणे असणाऱ्या मिळकतींवर करआकारणी केली जात आहे. त्यामध्ये बदल होण्यासाठी न्यायालयामध्ये क्र. ६५/२००१ नुसार याचिका दाखल झाली होती. मागणीच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला आहे. तशा सूचना शासनाला केल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून ग्रामविकास विभागाने नवीन करधोरण अस्तित्वात येईपर्यंत ग्रामपंचायतींनी मिळकतींवर कर वसूल करू नये असे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार नवीन प्रणाली अस्तीत्वात येईपर्यंत आणि पुढील आदेश मिळेपर्यंत प्रशासनाने १ एप्रिलपासून करवसुली करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे परिपत्रक मिळाल्यापासून ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारच्या मिळकतींवरील कर घेता येणार नाहीत. मिळकतनोंंदी, फेरफारनोंदी करता येणार नाहीत. घरठाण उतारे, वीजजोड घेण्यासाठी, तसेच व्यवसाय उभारणीसाठी लागणारे ना हरकत दाखलेही देता येणार नसल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. त्यातच प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर अद्यापही निर्णय होत नसल्याने ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचा मार्गच खुंटला आहे. ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळण्याचा कर हाच मुख्य स्रोत आहे. या उत्पन्नाच्या आधारेच ग्रामपंचायत निधी उभा करून गावातील अंतर्गत रस्तेनिर्मिती, गटारांची सुविधा, कचरा निर्मुलन, आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. या वर्षीच्या मार्चअखेरपर्यंत अनेक ग्रामपंचायतींनी आपल्याकडील बहुतांश निधी प्रस्तावित विकासकामांसाठी खर्च केला आहे. त्यामुळे मार्चनंतर तिजोरीत नव्याने भरणा होईल, असा प्रयत्न गावचे पदाधिकारी करीत होते. त्यानुसार काही ग्रामपंचायतींनी कराचे प्रमाण वाढवून नव्याने आपले अंदाजपत्रक सादर करण्याची तयारी केली होती. मात्र हातात निधीच नसल्याने ग्रामविकासासाठी आर्थिक तरतूद कशी करावी असा प्रश्न कारभाऱ्यांपुढे पडला आहे. पदाधिकाऱ्यांच्या मासिक सभेत कोणते विषय मंजूर करायचे असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे आहे. हातात घेतलेली कामेही निधीअभावी रखडू लागली आहेत.याबाबत ग्रामस्थांमधून, तसेच ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. करवसुलीस असणारी स्थगिती उठवावी, त्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रशासनाने तत्काळ कराव्यात, अशी मागणी ते करीत आहेत.(प्रतिनिधी)