शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात मैलापाण्याची डबकी

By admin | Updated: January 24, 2017 02:27 IST

मागील महिन्याभरापासून बेबी कालव्यातून पाणी बंद झाले, तर नव्या कालव्यातून गेल्या आठवड्यापासून पाण्याचा विसर्ग बंद

हडपसर : मागील महिन्याभरापासून बेबी कालव्यातून पाणी बंद झाले, तर नव्या कालव्यातून गेल्या आठवड्यापासून पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. त्यामुळे कालव्यात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठली असून, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद असल्याने तातडीने पाटबंधारे आणि महापालिकेने कालव्याची स्वच्छता करून औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पुणे शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याप्रमाणे मुंढवा येथे जॅकवेल प्रकल्प उभारला आणि गेल्या वर्षभरापासून खुटबावपर्यंत शेतीसाठी पाणी सुरू केले. गेल्या महिन्याभरापासून मुंढवा जॅकवेलमधून बेबी कालव्यात पाणी सोडले नाही. जॅकवेलमधून एका पंपाद्वारे पाणी कालव्यात सोडले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कालव्यात पाणी येत नसल्याचे चित्र दिसत आहे.कालव्यात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठल्यामुळे मोकाट कुत्री, जनावरे आणि डुकरांचा वावर वाढला आहे. कालव्यालगतचे नागरिकही कचरा टाकतात. त्यामुळे कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कालव्यालगतच्या महापालिका आणि ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.मुंढवा जॅकवेलमधून पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच पाणी कालव्यात सोडावे, असे नियोजन आहे. मात्र, प्रत्यक्षात नदीतील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट पाणी कालव्याद्वारे शेतीसाठी सोडले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेवर कायदेशीर कारवाई केली होती. त्याचबरोबर हरित लवादानेही पाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्यामुळे आक्षेप घेतला होता. त्यानंतर शेवाळवाडी, साडेसतरानळी व कालव्यालगतच्या अनेक ग्रामपंचायतींच्या वतीनेही हरकती नोंदविल्या होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जॅकवेलमधून सोडल्या जाणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याविषयी पालिकेवर याचिका दाखल केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)