Pune | कौटुंबिक वादातून पतीने धारदार कोयत्याने वार करून केला पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 20:15 IST2023-01-09T20:15:14+5:302023-01-09T20:15:42+5:30

पतीस अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल...

Due to a family dispute, the husband killed his wife by stabbing him with a sharp knife | Pune | कौटुंबिक वादातून पतीने धारदार कोयत्याने वार करून केला पत्नीचा खून

Pune | कौटुंबिक वादातून पतीने धारदार कोयत्याने वार करून केला पत्नीचा खून

कामशेत (पुणे) : येथील पोलिस ठाणे हद्दीतील रॉयल चायनीजच्या मागील बाजूस असलेल्या राहत्या घरी कौटुंबिक वादाचा राग मनात धरून पतीने पत्नीचा खून केला आहे. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तत्काळ आरोपी पतीस अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल केली आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९ च्या सुमारास पती दशरथ विठ्ठल शिंदे (वय ४३, रा. रॉयल चायनीज मागे, कामशेत, ता. मावळ) याने कौटुंबिक वादाचा राग मनात धरून पत्नी मयूरी दशरथ शिंदे (वय ३८, रा. रॉयल चायनीज मागे, कामशेत, ता. मावळ) हिचा धारदार कोयत्याने डोक्यात गंभीर वार करून खून केला. या प्रकरणी आरोपी पतीस अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोणावळा विभाग सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार, उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी भेट दिली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार करत आहेत.

Web Title: Due to a family dispute, the husband killed his wife by stabbing him with a sharp knife