शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या महागाईमुळे दिवाळीचा फराळ काढणार ‘दिवाळं’

By admin | Updated: October 25, 2015 03:37 IST

दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची चाहूल बाजारात जाणवत आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे दिवाळीचा गोडधोड फराळ यंदा सर्वसामान्यांचे दिवाळं काढणारा

बारामती : दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची चाहूल बाजारात जाणवत आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे दिवाळीचा गोडधोड फराळ यंदा सर्वसामान्यांचे दिवाळं काढणारा ठरणार आहे. फराळाची लज्जत वाढविणारे लाडू यंदा डाळींच्या महागाईने वेढले आहेत. गतवर्षीच्या तुलनेने किराणा मालाचे दर दीडपटीने वाढले आहेत.फराळाच्या ताटातील लज्जत वाढविणारे बुंदीचे लाडू, बेसन लाडू, शेव, चकली, शेवलाडू आदी पदार्थ हे हरभरा डाळीपासून तयार होणाऱ्या बेसनापासून बनतात. बारामती शहरातील बाजारपेठेतहरभरा डाळ ७२ ते ७५ रुपये प्रतिकिलो दराने विक्रीला आहे. गतवर्षी हाच दर ४० ते ४२ रुपये प्रतिकिलो होता. दीडपटीहून अधिक हे दर वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे यंदाची लक्षात राहणारी ठरेल तर बेसन पीठ सध्या बाजारात ८० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. गतवर्षी हाच दर ४८ ते ५० रुपये प्रतिकिलो होता, असे निमसाखर येथील दुकानदार संतोष दहीदुले यांनी सांगितले.वाढलेले दर, दुष्काळी परिस्थिती यामुळे ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. गरजेपुरता किराणा माल खरेदी करण्याकडे व्यावसायिकांनी लक्ष केंद्रीत केले आहे.शासनाकडून साठेबाजीवर होणाऱ्या कारवाईचा देखील बाजारपेठेवर परिणाम जाणवत आहे. किरकोळ दुकानदारांनी ‘थांबा आणि पहा’ असे धोरण स्वीकारले आहे. दरातील चढउतार पाहता किराणा मालाची खरेदी करण्यास काही व्यापारी धजावत नसल्याचे चित्र आहे. तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. १५ किलोच्या तेल डब्यामागे एका महिन्यात १०० ते १५० रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. शेंगदाणे १०० ते ११० रुपये प्रतिकिलो दराने विक्रीला आहे. चिवड्याची लज्जत वाढविण्यासाठी शेंगदाणे महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे दिवाळी फराळासाठी आवश्यक असणाऱ्या किराणा मालात चांगलीच वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळाने हैराण झालेल्या सर्वसामान्यांची दिवाळी साजरी करताना चांगलीच दमछाक होणार आहे. (प्रतिनिधी)