शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

माहेराहून पैसे न आणल्याने विवाहितेला पेटविले

By admin | Updated: January 16, 2015 01:20 IST

माहेराहून पैसे न आणल्याच्या कारणावरून कांता ऊर्फ सविता तुकाराम मोहोळ या विवाहितेला रॉकेल ओतून पेटविल्याची घटना मावळ तालुक्यातील कडधे येथे घडली

वडगाव मावळ : माहेराहून पैसे न आणल्याच्या कारणावरून कांता ऊर्फ सविता तुकाराम मोहोळ या विवाहितेला रॉकेल ओतून पेटविल्याची घटना मावळ तालुक्यातील कडधे येथे घडली. ती मृत्यूशी झुंज देत असून आरोपी मात्र मोकाट आहेत. या घटनेत विवाहिता ९५ टक्के भाजली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कांता व तुकाराम यांचा २७ मार्च २००७ रोजी विवाह झाला. विवाहानंतर सात ते आठ महिने संसार सुखात सुरू होता. नवव्या महिन्यापासून आरोपी पती तुकाराम भाऊ मोहोळ (वय ३१), सासरा भाऊ मोहोळ (वय ६५) व सासू द्रुपदाबाई मोहोळ (वय ६०, तिघे रा. कडधे, पवनमावळ, ता. मावळ जि. पुणे) हे कांता यांना माहेराहून पैसे व संसारोपयोगी वस्तू आणण्याची मागणी करू लागले. यावरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. हा छळ थांबविण्यासाठी विवाहितेच्या वडिलांनी अनेकदा पैसे व संसारोपयोगी वस्तूची मागणी पूर्ण केली. दरम्यान, मंगळवारी रात्री तुकाराम याने कांता यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने तुकाराम याने काठी, हाताने मारहाण करीत पैसे घेऊन बाहेर निघून गेला. काही वेळाने दारु पिऊन परतला. घराचा दरवाजा आतून बंद करून कांताच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. रॉकेलचा भडका झाल्याने त्याचाही हात भाजला. त्यानंतर त्याने घरातून पळ काढला. कांता यांच्या आरडाओरड्याने शेजारील रहिवासी धावून आले. आग विझवून उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे दाखल करून न घेतल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविले. (वार्ताहर)