शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

पावसाच्या जोरदार सरींमुळे जिल्हयातील १६ धरणांमधून सोडले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 4:33 PM

धरणक्षेत्रात गुरुवार पासून शुक्रवार पर्यंत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत...

पुणे : शंभर टक्के भरलेली धरणे आणि गुरुवारपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने जिल्ह्यातील १६ धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजल्यापासून खडकवासला धरणातून १३,९८१ क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. धरणक्षेत्रात गुरुवार पासून शुक्रवार पर्यंत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. सोमवारी सकाळी सहा पर्यंत पिंपळगाव जोगे २८, माणिकडोह ३२, येडगाव ३५, वडज १८, कळमोडी ३३, चासकमान १८, भामाआसखेड १२, वडिवळे ४०, आंद्रा २३, पवना ३५, कासारसाई १४, मुळशी १९, टेमघर ३०, वरसगाव ३८, पानशेत ३९ आणि खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुंजवणी आणि निरा देवघरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पाऊस झाला. पिंपळगाव जोगे, माणिकडोह आणि येडगाव वगळता सर्वधरणे भरलेली आहेत. त्यातच पाऊस सरी कोसळत असल्याने धरणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळी ३,४६८ क्युसेक पाणी मुठानदीत सोडण्यात येत होते. रात्री आठ वाजता त्यात ९,४१६ आणि शुक्रवारी पहाटे दोन वाजता १३,९८१ क्युसेक पर्यंत वाढ करण्यात आली. डिंभे धरणातून ३ हजार १४, घोड दीड हजार, चासकमान १८५०, भामा आसखेड २७४१, वडीवळे १७७६, आंद्रा १६२०, मुळशी ५१३० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.  गुंजवणीतून १७८०, निरा देवघर ३३६६ आणि भाटघर धरणातून ७०० क्युसेकने पाणी वीर धरणात जमा होत होते. त्यामुळे वीर धरणातून १३,९६१ क्युसेक पाणी सोडण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणी