शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुबईतील यंत्रणा सतर्क! ड्रोन-मिसाईल हवेतच नष्ट, दैनंदिन जीवन पूर्ववत, मराठी युवकाने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:48 IST

काही वेळा ड्रोन किंवा मिसाईल हल्ल्याचा धोका निर्माण होतो; मात्र दुबई सरकारची सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क असल्याने ड्रोन किंवा मिसाईल हवेतच नष्ट केले जातात

पांडुरंग मरगजे

धनकवडी (पुणे) : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर टीव्ही आणि सोशल मीडियावर दाखवली जाणारी परिस्थिती आणि प्रत्यक्ष दुबईतील वास्तव यात फरक असल्याचे दुबईत नोकरीनिमित्त राहत असलेल्या मराठी तरुण आशिष वीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ड्रोन-मिसाईल हवेतच निष्प्रभ केले जात असून सध्या दुबईतील दैनंदिन जीवन जवळपास पूर्ववत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुबईतील आपल्या मुला-मुलींची भारतातील आई-वडिलांनी काळजी करू नये असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

गेल्या साडेतीन वर्षांपासून इमिरेट्स एअरलाइन्स या विमान कंपनीमध्ये कार्यरत आशिष वीर यांनी सांगितले की, काही वेळा ड्रोन किंवा मिसाईल हल्ल्याचा धोका निर्माण होतो; मात्र दुबई सरकारची सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क आहे. अशा प्रकारचे ड्रोन किंवा मिसाईल हवेतच नष्ट केले जातात. त्यामुळे ते जमिनीवर किंवा इमारतींवर आदळण्यापूर्वीच धोका टळतो. हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे प्रकार आढळत नाहीत.

संयुक्त अरब अमिराती सरकार नागरिक, पर्यटक आणि परदेशी कामगारांची अत्यंत काळजी घेत असल्याचेही वीर यांनी नमूद केले. शहरातील दैनंदिन जीवन जवळपास पूर्वीसारखेच सुरू असून लोक कामावर जात आहेत. इराण हल्ल्याच्या सुरुवातीचे दोन दिवस सावधगिरी बाळगण्यात आली; मात्र तिसऱ्या दिवसापासून परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टर व समुपदेशनाचीही सुविधा

सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही संभाव्य धोका आढळल्यास प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट पाठवला जातो. धोका टळल्यानंतर ‘थँक यू फॉर युवर कोऑपरेशन’ असा संदेश देत लोकांना पुन्हा दैनंदिन कामे सुरू करण्याचे आवाहन केले जाते. काही विमानसेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असून, बाहेरच्या प्रवाशांना सुरक्षितरीत्या त्यांच्या देशात पाठवण्याचे प्रयत्न होत आहेत. शाळाही सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. लहान मुलांवर मानसिक ताण येऊ नये यासाठी समुपदेशन सत्रांची व्यवस्था करण्यात आली असून गरज भासल्यास डॉक्टर व समुपदेशनाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कृतज्ञतेचा भावनिक निरोप

भारताकडे परतताना दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन वर्षांच्या तनिष्का वीर हिने फलकावरून दुबई प्रशासनाचे आभार मानले. प्रादेशिक तणावाच्या काळातही सुरक्षितता आणि नम्र वागणूक दिल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. दुबईतील प्रेमळ वातावरण आणि सुरक्षित अनुभव आयुष्यभर लक्षात राहील, अशी भावना तिने व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Dubai Safe: Missiles Intercepted, Life Normal, Marathi Youth Shares Experience

Web Summary : Dubai remains safe despite regional tensions. Missiles are intercepted mid-air. Daily life continues normally, according to Ashish Veer, an Emirates employee. Authorities provide support, ensuring residents' safety and well-being. Schools offer online classes and counseling.
टॅग्स :PuneपुणेIranइराणAmericaअमेरिकाDubaiदुबईairplaneविमानAirportविमानतळpassengerप्रवासी