शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

डी.एस.कुलकर्णींना 'घरघर' ! 124 मालमत्तांवर टाच, जप्तीची अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 10:21 IST

ठेवीदारांची फसवणूक केल्याने सध्या कारागृहात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांची मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने जारी केली आहे.

पुणे -  ठेवीदारांची फसवणूक केल्याने सध्या कारागृहात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांची मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. त्यामुळे आता ठेवीदारांना त्यांच्या ठेवीचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या या अधिसूचनेत विविध ठिकाणी असलेल्या 124 जागा, विविध कंपनीच्या नावावरील तसेच वैयक्तिक अशी एकूण 276 बँक खाती आणि महागड्या आलिशान गाड्यांसह 46 दुचाकी व चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. 

डीएसके यांच्या पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष तसेच कंपन्यांच्या नावावर या जागा, बँक खाती आणि वाहने आहेत. डीएसके यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर, कोल्हापूर आणि मुंबई येथील पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम १९९९ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करुन त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्या मालमत्तांची यादी पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने करुन पुढील कारवाईसाठी जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात आली होती. तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याची जबाबदारी मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार करुन सुमारे तीन महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठवले होते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता ही अधिसूचना जाहीर झाली आहे.

पुढील प्रक्रिया कशी असेल?अधिसूचनेद्वारे शासनाने डीएसके यांची ही मालमत्ता आता जप्त केली आहे. यापुढे त्या प्रत्येक मालमत्तेचे मूल्य किती असेल, हे निश्चित केले जाईल. त्यानंतर तिचा लिलाव केला जाईल. जो अधिक बोली बोलेले, त्याच्या नावावर ही मालमत्ता होईल. या मालमत्ता तारण ठेवून डीएसके यांनी कर्ज घेतले असेल तर त्या बँका न्यायालयात अर्ज करुन आपला क्लेम मांडू शकतील. लिलावातून आलेल्या पैसे एका स्वतंत्र बँक खात्यात जमा केले जातील. त्यानंतर ठेवीदारांची यादी तयार करुन ती न्यायालयात सादर होईल. न्यायालय जो आदेश देईल, त्यानुसार त्याप्रमाणात ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील. ही प्रक्रीया खूप प्रदीर्घ असून त्याला वर्षाहून अधिक काळही लागू शकतो. शासकीय यंत्रणा किती वेगाने लिलाव सुरु करते. त्याला कसा व किती प्रतिसाद मिळतो. त्यानंतर न्यायालय किती लवकर यावर निर्णय देते, यावर ठेवीदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार यावर ते अवलंबून आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस.कुलकर्णीCrimeगुन्हा